लाभार्थ्यांनी सहमतीपत्र जमा करावे
* तहसिल कार्यालयात संपर्क साधावा
यवतमाळ, दि. 29 : केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्तीवेतन योजनांच्या लाभार्थ्यांनी आपले सहमतीपत्र 20 जून 2016 ते 8 जुलै 2016 या कालावधीमध्ये संबंधित तहसिल कार्यालयात संपर्क साधून सादर करावे, असे आवाहन यवतमाळचे जिल्हादंडाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
केंद्र शासनाकडून राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्याच्या तीन योजना राबविण्यात येतात. जिल्ह्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे 40 हजार 624 लाभार्थी, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेचे एक हजार 83 लाभार्थी, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्तीवेतन योजनेचे 233 लाभार्थी योजनेचा लाभ घेत आहेत. योजनेच्या लाभार्थ्यांकडून त्यांचा आधार क्रमांक आणि भ्रमणध्वनी क्रमांक या योजनेचा लाभासाठी सहमतीपत्र भरून देण्यात येणार आहे.
यासाठी संबंधित तहसिलमध्ये लाभार्थ्यांसाठी संजय गांधी योजनेच्या तहसिलदारामार्फत विशेष मोहिम 20 जून ते 8 जुलै या कालवधीमध्ये राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे लाभार्थ्यांकडून प्राप्त झालेले त्यांचे आधार क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक सहमतीपत्रासह लाभार्थ्यांच्या बँकेशी जोडण्यात येत आहे. त्याकरीता लाभार्थ्यांना या येाजनेंतर्गत मिळणारा लाभ सरळ बॅंक खात्यात जमा होईल. तसेच लाभ जमा झाल्याचा संदेश लाभार्थ्यांच्या भ्रमणध्वनीवर जाईल.
या योजनेचा लाभार्थ्यांचे लाभ सुरळीत सुरु ठेवण्यासाठी सहमतीपत्र संबंधित कार्यालयात सादर करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांचे आधार क्रमांक नसल्यास त्यांना नोंदणीकरीता जवळच्या तहसिल कार्यालयात आधार नोंदणीकरीता उपलब्ध रून देण्यात आले आहे. याचा नागरीकांनी लाभ घ्यावा, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी