अण्णासाहेब पाटील महामंडळाची बिज भांडवल योजना
यवतमाळ, दि. 29 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे प्रवर्गातील बेरोजगार उमेदवारांसाठी बिज भांडवल योजना राबविण्यात येते. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या प्रवर्गातील बेरोजगार उमेदवारांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी स्वतंत्र महामंडळ नाही, अशा आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील बेरोजगारांना या महामंडळातर्फे बिज भांडवल योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. योजनेंतर्गत 5 लाख रूपयांपर्यंत गुंतवणूकीची प्रकल्प मर्यादा असलेल्या व्यवसायास 60 टक्के बँक वाटा, बँक मंजूर रकमेच्या 35 टक्के महामंडळाची मार्जिन मनी आणि 5 टक्के लाभार्थी हिस्सा आहे. महामंडळाच्या रक्कमेवर 4 टक्के व्याज आकारल्या जाते. योजनेसाठी उमेदवार राज्याचा रहिवासी आणि 18 ते 45 वयोगटातील असावा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 55 हजार, ग्रामीण भागात 40 हजाराच्या आत असावे, कुटुंबातील कोणीही बँक थकबाकीदार नसावा, अशा अटी आहेत.
अर्जासोबत उत्पन्न, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, सेवायोजन ओळखपत्र, स्वत:चे प्रतिज्ञापत्र व सातबारा, व्हॅल्युएशन, जमानतदाराचे प्रतिज्ञापत्र व सातबारा, प्रकल्प अहवाल, कोटेशन, जागेचा पुरावा, बँकेचे नो ड्यू सर्टिफीकेट, रहिवासी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. अर्ज महामंडळाच्या www.mahaswayamrojgar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन भरता येईल. अर्ज पुर्णपणे भरल्यानंतर ते तीन प्रतिमध्ये जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे आवश्यक कागदपत्रांसह सादर करावे लागणार आहे. त्यानंतर कार्यालयातील अधिकारी स्थळ पाहणीची तारीख निश्चित करतील. त्यानंतर कर्ज प्रकरण संबंधित राष्ट्रीयकृत बँकेकडे मंजुरीसाठी पाठवतील. बँकेकडून कर्ज प्रकरण मंजूर झाल्यानंतर हे प्रकरण महामंडळाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येते. महामंडळाकडून कर्ज प्रकरण मंजूर झाल्यानंतर महामंडळचा सहभाग बँकेकडे पाठविण्यात येतो. कर्ज मंजुरीनंतर अर्जदाराला कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उद्योग भवन, तिसरा मजला, दारव्हा रोड, यवतमाळ येथे संपर्क साधावा, असे केंद्राच्या सहाय्यक संचालकांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी