सहकारी संस्थांनी लेखापरिक्षण करण्याचे आवाहन
* लेखापरीक्षण केले नसल्यास पाच हजारापर्यंत दंड
यवतमाळ, दि. 22 : जिल्ह्यातील पशु, दुग्ध व मत्स्य सहकारी संस्था आणि संघांनी सन 2015-16 या कालावधीचे वैधानिक लेखापरिक्षण दिनांक 31 जुलैपुर्वी किंवा संस्थेने मागणी केल्यास वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस दिनांक या दोन्ही दिनांकामध्ये प्रथम येणाऱ्या दिनांकापूर्वी संबंधीत लेखापरिक्षकांकडून वैधानिक लेखापरिक्षण पूर्ण करून घेणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम नुसार बंधनकारक आहे. लेखापरीक्षण केले नसल्यास पाच हजार रूपयांपर्यंत दंड करण्यात येणार आहे.
संस्था, संघाने वैधानिक लेखापरिक्षण विहीत मुदतीत न केल्यास महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमानुसार विवरणपत्रे अचूक दाखल करू शकणार नाही. अशा संस्था, संघांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 146 (ग) नुसार अपराध मानून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 147 (ग) नुसार 5 हजार रुपयापर्यंत दंडाची शास्ती लावण्याबाबतचा प्रस्ताव सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) यवतमाळ यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. याबाबत अडचणी आल्यास जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग २, सहकारी संस्था (पदुम) या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी