वणी, मारेगाव, झरी येथील आयटीआयसाठी ऑनलाईन अर्ज
यवतमाळ, दि. 25 : दहावी उत्तीर्ण, अनुउत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांसाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वणी, मारेगाव, झरीजामणी येथे प्रवेश 2016 या सत्रासाठी सोमवार, दि. 27 जून पासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. दि. 10 जुलैपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत सर्व दिवस ही प्रक्रिया सुरु राहणार आहे.
याबाबत मार्गदर्शन, माहितीसाठी संस्थेत भेट द्यावी किंवा www.admission.dvet.gov.in या वेबसाईटवर माहिती प्राप्त करावी, असे आवाहन वणी, मारेगाव, झरीजामणी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी कळविले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल