राष्ट्रीय पिक विमा योजनेच्या नुकसान भरपाईच्या
रक्कमेतून कर्ज कपात करण्यात येवू नये
·       जिल्हाधिकारी यांचे निर्देश
यवतमाळ, दि. 24 : राष्ट्रीय पिक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम-2015 मध्ये राज्यात एकूण 4205.02 कोटी ऐवढी नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना देय झाली आहे. सदर रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीकडून संबंधीत बँकाकडे दिनांक 27 ते 31 मे च्या दरम्यान आरटीजीएसद्वारे जमा करण्यात आली आहे. या रक्कमेतून पिक कर्जाची रक्कम कपात करण्यात येवू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले आहे.
आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यात एकूण 57 कोटी रूपये एवढी रक्कम शेतकऱ्यांचे बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. राष्ट्रीय पिक विमा योजनेच्या तरतुदी नुसार बँकांना नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त झाल्यापासून 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे बंधनकारक आहे. त्यामुळे उर्वरित रक्कम जमा करण्याची कार्यवाही तात्काळ करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी