महिला व बालविकासच्या योजनांसाठी अर्ज आमंत्रित
यवतमाळ दि. 30 : जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे वैयक्तिक लाभाच्या विविध योजना राबविण्यात येते. या योजनांसाठी ग्रामीण भागातील इच्छुक आणि पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामीण आदिवासी क्षेत्रातील वर्ग 5 ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या मुलींना सायकल पुरविणे, ग्रामीण आदिवासी क्षेत्रातील मुलींना व महिलांना 90 टक्के अनुदानावर शिलाई मशिन पुरविणे, मुली-महिलांना फॅशन डिझायनिंगचे व्यावसायिक तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
योजनेच्या लाभासाठी दिनांक 31 ऑगस्टपर्यंत जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास येथे पंचायत समिती मार्फत इच्छुकांनी अर्ज करावा, असे आवाहन महिला बाल विकासचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस