जिल्हा सेतू सोसायटीच्या पदभरतीसाठी लेखी परीक्षा
यवतमाळ, दि. 28 : जिल्हा सेतू सोसायटी यवतमाळतर्फे कंत्राटी तत्त्वावर पदभरती 2016 करीता ऑनलाईन अर्ज दाख्ला केलेल्या पात्र उमेदवारांची कंत्राटी पदनिहाय लेखी परीक्षा 2 आणि 3 जुलै रोजी घेण्यात येणार आहे.
2 जुलै रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 पर्यंत क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर  पदासाठी 210 उमदेवारांची परीक्षा घेण्यात येणार असून 3 जुलै रोजी दुपारी 3 ते 3.40 वाजेदरम्यान सहायक कार्यक्रम अधिकारी पदासाठी पात्र ठरले 115 उमेदवार, सहायक कार्यक्रम अधिकारी (लेखा) पदासाठी 52, तांत्रिक अधिकारी (स्थापत्य अभियंता) पदासाठी 288, तांत्रिक अधिकारी (कृषि) पदासाठी 53 उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार आहे.
या परीक्षेचे प्रवेश पत्र www.maharecruitment.mahaonline.gov.in या वेबसाईटवरून डाऊनलोड करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल