मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमानतळावर स्वागत
यवतमाळ दि. 5 : यवतमळ येथील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह परिवहन मंत्री दिवाकर रावते, जलसंपदा मंत्री गिरिष महाजन यांचे आज सकाळी 11.10 वाजता स्व.जवाहरलाल दर्डा विमानतळावर आगमन झाले.
यावेळी पालकमंत्री संजय राठोड तसेच अन्य मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पालकमंत्र्यांसह गृहराज्यमंत्री डॅा.रणजित पाटील, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, खा.भावनाताई गवळी, आ.मदन येरावार, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.राजू तोडसाम, आ.डॅा.अशोक उईके, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार सिंगला, पोलिस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह आदी उपस्थित होते. 
00000



Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी