कामगारांसाठी बाभुळगाव येथे गुरूवारी नोंदणी शिबीर
 यवतमाळ, दि. 28 : महात्माक गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत काम करणाऱ्या बांधकाम मजुरांना महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदीत करून घेण्यासाठी गुरूवारी, दि. 30 जून रोजी बाभुळगाव येथे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर पंचायत समितीमध्ये सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत राहणार आहे.
या शिबीरामध्ये केवळ मनरेगा अंतर्गत कामगारांची नोंदणी केली जाईल. इतर ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांनी सरकारी कामगार अधिकारी यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष येऊन नोंदणी करावी. मागील 12 महिन्यात किमान 90 दिवस काम केलेल्याच कामगारांची नोंदणी करण्यात येणार आहे. मंडळामध्ये नोंदणीसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड, जन्म तारखेचा पुरावा, ओळखपत्र, रहिवासी पुरावा, राशन कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुकची छायांकित प्रत आणि चार पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे. नोंदणी शुल्क 85 रूपये भरून नोंदणी करण्यात येणार आहे.
मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या कामगारांनी वरीलप्रमाणे कागदपत्रे तयार ठेवावी, तसेच तालुकास्तरावरील शिबीर आयोजित केले जाईल, त्यावेळी आपली नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह आणि सरकारी कामगार अधिकारी रा. दे. गुल्हाने यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

कृषी महोत्सवात शेती विषयक माहितीचे विविध स्टॉल