अनूसुचित जमातीसाठी स्वाभिमान व सबळीकरण योजना
यवतमाळ, दि. 28 : पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने सन 2016-17 या वर्षात भुमिहिनांना जमिन देण्यासाठी आदिम जमातीचे विकास आणि संरक्षण आणि स्वाभिमान सबळीकरण योजनेंतर्गत भूमिहिनांना जमिन देण्याची योजना राबविण्यात येणार आहे.
पांढरकवडा कार्यालयाच्या वतीने येत असलेल्या यवतमाळ, बाभूळगाव, कळंब, राळेगाव, वणी, मारेगाव, केळापूर, घाटंजी, झरी-जामणी या तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांना कसण्यासाठी जमिन उपलब्ध करून द्यावयाची आहे. त्यासाठी आदिवासी उपयोजना क्षेत्रातील जे शेतकरी जमिन विकण्यास इच्छुक आहेत, त्यांनी तात्काळ प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा यांच्या कार्यालयात जमिन विक्रीबाबत अर्ज, जमिनीचा सात-बारा, नमुना आठ अ, फेरफार, हक्क नोंदणी, प्रतिक्षा लेख, जमिन विक्री करणाऱ्या वारसांचे संमतीपत्र, जमीन घेण्यास हरकत नसल्याबाबत तहसिलदारांचे पत्र, दुय्यम निबंधक कार्यालयातील त्या भागाती जमिनीचे दर, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, तालुका निरीक्षक, भूमि अभिलेख यांच्याकडून जमिन मोजणी, आदिवासी जमीन वाटप करीत असल्याचे प्रमाणपत्र यासह संपर्क करावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी