शेतकऱ्यांचे प्रेरणादायी छायाचित्र प्रकाशित करा
*जिल्‍हाधिकारी सिंह यांचे माध्‍यमांना आवाहन
यवतमाळ, ता. २९ : वृत्‍तपत्र आणि लेक्‍ट्रानिक्‍स माध्‍यमांनी शेतकऱ्यांची केविलवाणी छायाचित्र प्रकाशित आणि प्रसारीत न करता इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल, त्‍यांचे मनोधैर्य, मनोबल उंचावेल अशा प्रकारचे छायाचित्र प्रकाशित करावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
जिल्ह्यात मागील दोन-तीन वर्षापासून कधी ओला, तर कधी कोरडा दुष्‍काळ पडत आहे. यातून शेतकऱ्यांच्‍या उत्‍पन्नात घट येत आहे. हे जरी वास्‍तव असले असले तरी शेतकरी हा सर्वांचा उदरनिर्वाहकर्ता आहे. बळीराजाकडे पोशिंदा म्‍हणून सर्व जग पाहते. अशावेळी त्‍याचा अपमान होईल, असे माध्‍यमांनी त्‍यांची विदारक स्थिती किंवा त्‍याचे छायाचित्र प्रकाशित न करणे आपले कर्तव्‍य आहे. त्‍यांच्‍याप्रती आदर माध्‍यमांनी दाखविण्‍याचे आवाहन जिल्‍हाधिकारी सिंह यांनी केले.
            पांढऱ्या सोन्‍याचा जिल्‍हाम्‍हणून संपूर्ण देशात ओळखला जात असल्‍याचे वास्‍तव आहे. परंतु काही वर्षांपासून शेतकरी आत्‍महत्‍याग्रस्‍त जिल्‍हा म्‍हणून नावारूपास येत आहे. त्‍यामुळे ही ओळख पुसून टाकण्‍यासाठी वृत्‍तपत्र माध्‍यम आणि‍ लेक्‍ट्रानिक्‍स माध्‍यम यांचा मोलाचा सहभाग आवश्‍यक आहे. त्‍याचबरोबर शेतकऱ्यांचे मनोबल उंचाविणे, त्‍यांच्‍या आत्‍मविश्‍वास निर्माण करण्‍यासाठी बळीराजा चेतना अभियानजिल्‍हाभर राबविण्‍यात येत आहे. यामाध्‍यमातून थेट शेतकऱ्यांच्‍या दारापर्यत हे अभियान पोचविल्‍या जात आहे.
समाजातील प्रत्‍येक घटक आज शेतकऱ्यांच्‍या उन्‍नतीसाठी प्रयत्‍न करीत आहे. यातून सकारात्‍मक संदेशही शेतकऱ्यांपर्यंत जात आहे. त्‍यामुळे  माध्‍यमांनाही शेतकऱ्यांची विदारक दृष्‍य दाखविणारे, केविलवाणी छायाचित्र प्रकाशित न करता, शेतात काम करणार शेतकरी, ट्रॅक्‍टर चालविणारा, भरघोस उत्‍पन्‍न घेत असलेला, शेतात हिरवेगार पिक असेलेले, सिंचन करणारा शेतकरी अशा आशयाचे इतरही  छायाचित्र प्रकाशित आणि प्रसारीत  करावे, असे आवाहन माध्‍यमांना केले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी