रविवारी अर्ज द्या, कर्ज घ्‍या मेळावा
* १५४ शाखास्‍तरावर होणार कर्ज उपलब्‍ध
यवतमाळ, दि. २४ : बळीराजा चेतना अभिायानाअंतर्गत जिल्ह्यातील राष्‍ट्रीयीकृत बॅंकांच्‍या १५४ शाखा स्‍तरावर अर्ज द्या, कर्ज घ्‍यामेळाव्‍याचे आयोजन रविवारी, दि. २६ जून रोजी करण्‍यात आले आहे. या कर्ज मेळाव्‍याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
अभियानअंतर्गत जिल्ह्यामध्‍ये प्रत्‍येक बॅंक शाखेमध्‍ये पिक किंवा शेतीकरिता कर्ज पुरवठा मिळावे  यासाठी ‘अर्ज द्या, कर्ज घ्‍या अभियान राबविण्‍यात येत आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्जासाठी बॅंकांमध्‍ये सातत्याने जावे लागते. कागपत्रांची पूर्तता करण्‍यासाठी त्रास सहन करावा लागतो. वेळीच पतपुरवठा झाला नसल्यास शेतकरी आपल्‍या शेतामध्‍ये पेरणी करू शकणार नाही. त्‍यामुळे शेतकऱ्यांची कर्जासाठी होणारी पायपीट थांबविण्‍यासाठी त्‍यांना सुलभरित्‍या कर्ज उपलब्‍ध व्‍हावे, यासाठी मेळाव्याचे आयोजन रविवारी करण्‍यात आले आहे. या मेळाव्‍यासाठी प्रत्‍येक बॅंकेच्‍या शाखानिहाय एक संपर्क अधिकारी नियुक्त करण्‍यात आला आहे. या मेळाव्‍यातून पिककर्ज मिळण्‍यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्‍यात येणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामस्‍तरीय समितीचे अध्‍यक्ष आणि सचिव यांनी आपल्‍या गावामध्‍ये या मेळाव्‍याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचून शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देण्‍यासाठी पुढाकार घ्‍यावा, या मेळाव्‍यात मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल यांनी आपल्‍या भागातील बॅंकेत जावून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्‍ध करून देण्‍यासाठी मदत करण्‍याचे आदेशही जिल्‍हा प्रशासनाने दिले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी