घाटंजी येथे आज शाश्वत शेती प्रशिक्षण
यवतमाळ, दि. 22 : कृषी विभाग आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे शाश्वत शेती प्रशिक्षण आणि तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाना आणि अतिअडचणीतील शेतकऱ्यांना देशी कापसाचे बियाणे, डाळवर्गीय बियाणांच्या वाटपाचा कार्यक्रम घाटंजी येथे गुरूवारी, दि. 23 जून रोजी आयोजित करण्यात आला आहे.  कार्यक्रमाला कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी उपस्थित राहतील.
या कार्यक्रमानंतर श्री. तिवारी सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पीककर्ज आढावा बैठकीस उपस्थित राहतील. यात १९ जुन रोजी घेण्यात आलेल्या पीककर्ज वाटप कार्यक्रमाचा आढावा घेऊन शेतकरी आणि बँक अधिकारी यांना येत असलेल्या अडचणींचा आढावा घेण्यात येणार आहे. यावेळी २६ जून रोजीच्या विशेष पीककर्ज वाटप मेळाव्याची तयारीचाही आढावा घेण्यात येईल.
00000 

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी