महागाव प्रकल्पग्रस्तांची सभा
यवतमाळ, दि. 22 : दारव्हा तालुक्यातील महागाव लघु पाटबंधारे योजनेच्या प्रकल्प बुडीत क्षेत्रात बाधीत जमिनीच्या भुसंपादनाविषयी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून मार्गदर्शन करण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत दारव्हा येथे शुक्रवारी, दि. 17 जून रोजी सभा पार पडली.
दारव्ह्याचे उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्र. व. बोरसे, उपविभागीय अभियंता प्र. भा. साळवे, श्री. त्रिपाठी, भुमिअभिलेख उपअधीक्षक श्री. नागरकर, तसेच दारव्हा व महागाव (कसबा), वडगाव (आंध) या बुडीत क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते.
सभेला उपस्थित जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी महागाव प्रकल्पाच्या सद्य:स्थितीची माहिती दिली. भुधारक आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी अडचणी मांडून चर्चा केली. पालकमंत्री श्री. राठोड यांनी नवीन भुसंपादन कायदा आणि सरळ खरेदीद्वारे भुसंपादन करण्याच्या प्रक्रियेबद्दल शेतकऱ्यांना माहिती द्यावी, चालु रेडी रेकनरनुसार जमिनीचे अंदाजित प्रति हेक्टरी किंमत काढून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अंदाजित मोबदल्याची एकूण रक्कम त्यांना कळविण्याचे निर्देश दिले. तसेच जमिनीचा मोबदला तातडीने मिळावा याबाबत प्रशासनास निर्देश दिले. प्रकल्पामुळे दारव्हा तालुक्यातील महागांव व देऊरवाडी गावांना तसेच आर्णी तालुक्यातील लोणी व गणगांव या गावांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी