पुसद प्रकल्प कार्यालयाच्यावतीने अर्ज करण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 24 : पुसद येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्यावतीने विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांकरीता शेतात शेततळ्याचे खोदकाम करून प्लास्टीक अस्तरीकरणासह ठिंबक सिंचन संच आणि भाजीपाला फळबाग लागवडीसाठी अर्थसहाय्य देण्यासाठीच्या योजनेकरीता अर्ज मागविण्यात आले आहे. या योजनेचे अर्ज पुसद येथील प्रकल्प कार्यालयात उपलब्ध आहे. अर्जाचे वाटप दि. 24 जून ते 8 जुलैपर्यंत करण्यात येत असून हे अर्ज कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावयाचे आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावे, असे आवाहन पुसद येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यू. के. सकवान यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी