सिंदखेडवासी करणार वृक्षारोपण मोहिमेत श्रमदान
यवतमाळ, दि. 22 : नेर वनपरिक्षेत्रातील सिंदखेड येथे वृक्ष लागवड मोहिमेची जनजागृती करण्यासाठी रविवारी, दि. 19 जून रोजी सभा घेण्यात आली. या सभेत सिंदखेडवासीयांनी वृक्षारोपण मोहिमेत श्रमदान करण्याचे आश्वासन दिले.
अवधुत महाराज मंदिरात आयोजित सभेला कोब्रा ॲडव्हेंचर क्लबचे श्याम जोशी, सरपंच टिना फकीरा राठोड, फकीरा राठोड,  उपसरपंच मनोहर सवई राठोड, प्रा. शिवशंकर राठोड, आकाश पसले उपस्थित होते.
सभेत श्याम जोशी यांनी गावकऱ्यांना वृक्ष लागवडीची गरज विविध दाखले देऊन समजावून सांगितले. उपस्थित मान्यवरांनी सुद्धा वृक्ष लागवडीची गरज यावेळी बोलून दाखविली. त्यामुळे गावकऱ्यांना झाडाचे महत्त्व पटले. नागरीकांनी वृक्ष लागवड मोहिमेत तनमनाने सहभाग देण्याचे आश्वासन दिले. उपसरपंच मनोहर राठोड यांनी संतवचनाचे दाखले देऊन वृक्षाचे महत्त्व पटवून दिले. त्याचप्रमाणे नेर बाजार समितीचे प्रा. शिवशंकर राठोड यांनी झाडाचे रक्षण व्हावे म्हणून गावात ट्रीगार्ड देण्याचे आश्वासन दिले. महालक्ष्मी कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी वनविभागाचे कृष्णा आवारी, सविता भडके, अशोक कदम, भाऊराव नागलकर, किसन राठोड, तुळशिदास आडे,  संदिप पवार, वासुदेव राठोड, बंटी राठोड, संजय दाणी यांनी सहकार्य केले.
जवळगाव, घुई येथे ग्रामसभा
जवळगाव आणि घुई येथे सोमवारी, दि. 20 जून रोजी ग्रामसभा घेण्यात आली. जवळगाव येथे समाज मंदिरात वृक्ष लागवड मोहिमे संदर्भात सभा घेण्यात आली. उपस्थित गावकऱ्यांना श्याम जोशी यांनी मार्गदर्शन केले. येत्या 1 जुलै रोजीच्या वृक्ष लागवड मोहिमेत संपूर्ण सहकार्य करू असे आश्वासन यावेळी नागरीकांनी दिले. घुई येथेही ग्रामसभा होऊन येथील लोकांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहकार्य करण्याचे वनविभागाला आश्वासन दिले.

000000


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी