लाभार्थ्‍यांना कसण्‍यासाठी मिळणार जमीन
*जमीन विकण्‍यास ईच्‍छुकांनी संपर्क साधावा
*आदिवासी विकास प्रकल्‍प कार्यालय
यवतमाळ, दि. २२ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्‍प पांढरकवडा कार्यालय अंतर्गत कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना जमीन कसण्‍यासाठी वितरीत करण्‍यात येणार आहे. यासाठी या भागातील आदिवासी उपयोजना क्षेत्रातील जे शेतकरी जमीन विकण्‍यास इच्‍छुक आहेत, त्‍यांनी एकात्मिक प्रकल्‍प कार्यालय, पांढरकवडा येथे संपर्क साधण्‍याचे आवाहन  सहायक जिल्‍हाधिकारी तथा प्रकल्‍प अधिकारी यांनी केले आहे. 
            पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्‍प कार्यालय अंतर्गत यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, राळेगाव, वणी, मारेगाव, केळापूर, घाटंजी आणि झरीजामणी या तालुक्‍यांचा समावेश आहे. या भागातील लाभार्थ्‍यांना कसण्‍यासाठी जमीन उपलब्‍ध करून देण्‍यात येणार  आहे. त्‍यासाठी आदिवासी उपयोजना क्षेत्रातील जे शेतकरी जमीन विकण्‍यास इच्‍छुक आहे, अशा शेतकऱ्यांनी तत्‍काळ पांढरकवडा येथील प्रकल्‍प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्‍प कार्यालयात अर्ज सार करावा, तसेच जमीन विक्रीबाबत अर्ज, मिनीचा ७/१२ उतारा, नमुना आठ -अ, फेरफार, हक्‍क नोंदणी, प्रतिज्ञा लेख, जमीन विक्री करणाऱ्या वारसाचे प्रमाणपत्र, जमीन घेण्‍यास हरकत नसल्‍याबाबत तहसीलदारांचे पत्र, मुद्रांक शुल्‍क, नोंदणी शुल्‍क, तालुका निरीक्षक भूमि अभिलेख यांचेकडून जमीन मोजणी, आदिवासी जमीन वाटप करीत असल्‍याचे प्रमाणपत्र यासाठी  प्रकल्‍प कार्यलयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक जिल्‍हाधिकारी तथा  प्रकल्‍प अधिकारी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी