घाटकिन्ही, जांभोरा येथे वृक्षारोपण ग्रामसभा
यवतमाळ, दि. 23 : दारव्हा वन परिक्षेत्राअंतर्गत घाटकिन्ही आणि जांभोरा येथे वृक्षारोपणाबाबत ग्रामसभा नुकतीच पार पडली.
 घाटकिन्ही येथे मंगळवारी, दि. 21 जून रोजी सायंकाळी वृक्षारोपणासंदर्भात जनजागृती करण्यासाठी गावकऱ्यांची सभा घेण्यात आली. तसेच बुध्वारी, दि. 22 जून रोजी जांभोरा येथे गावकऱ्यांची बैठक घेण्यात आली. या दोन्ही सभाना कोब्रा ॲडव्हेंचर क्लबचे मानद सचिव श्याम जोशी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. दारव्हा वन परिक्षेत्राअंतर्गत 175 हेक्टर रोपवन क्षेत्रावर येत्या 1 जुलै रोजी 69 हजार 500 वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
दारव्हा वनपरिक्षेत्रात घाटकिन्ही, जांभोरा, नखेगाव, धामणगाव देव, देऊळगाव वळसा आदी रोपवनात वृक्ष लागवड होणार आहेत, अशी माहिती घाटकिन्हीचे क्षेत्र सहाय्यक विशाखा सेजव, तसेच जांभोराचे क्षेत्र सहाय्यक एस. एल. राठोड यांनी ग्रामस्थांच्या बैठकीत दिली. श्री. जोशी यांच्या आवाहनानुसार घाटकिन्ही आणि जांभोरा येथील दोन्ही सभांमध्ये उपस्थितांनी या मोहिमेत श्रमदान आणि सहभाग देऊन सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी