Posts

Showing posts from August, 2019

कामगारांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – पालकमंत्री येरावार

Image
v विविध कल्याणकारी योजनेचा लाभ वाटप सोहळा यवतमाळ दि.26 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मंडळाच्यावतीने कामगारांना 29 प्रकारच्या योजनांचा लाभ दिला जातो. यात कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय, विवाहासाठी अर्थसहाय्य, शिष्यवृत्ती, सुरक्षा किट, मृत्यु पश्चात कामगारांच्या कुटुंबांना अर्थसहाय्य, पुस्तकांचे वितरण आदींचा समावेश आहे. कामगारांसाठी असलेल्या या योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. दारव्हा रोडवरील गंगाकाशी लॉन येथे आयोजित विविध कल्याणकारी योजनेच्या लाभ वाटप सोहळयात ते बोलत होते. यावेळी जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, जिल्हा कामगार अधिकारी राजदीप धुर्वे, महिला विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक डॉ. रंजन वानखेडे, नितीन भुतडा, विजय खडसे, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात आतापर्यंत 73 हजार बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, कामगार कल्याण महामंडळाच्या योजनांसाठी 20 हजार कोटींची तरतूद आहे. सुईपासून ते विमान बनविण्यापर्यंत कामगारांचे योगदान आहे. देशाच्या पंतप्रधानांनी

पांदण रस्त्याच्या कामांना गती द्या - पालकमंत्री

Image
v शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचा नियमित आढावा घेण्याच्या सुचना यवतमाळ दि.22 : गावखेड्यांच्या दृष्टीने शासनाने सुरू केलेली पालकमंत्री पांदण रस्ता योजना अतिशय महत्वाची आहे. या योजनेशी संबंधित सर्व मान्यता स्थानिक स्तरावरच देण्याची तरतूद आहे. त्यामुळे कोणताही विलंब न करता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पादंण रस्त्यांच्या कामांना गती द्या, अशा सुचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, उपविभागीय अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, नगर पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, तहसीलदार शैलेश काळे, यवतमाळ नगर पालिकेचे मुख्याधिकारी अनिल अढागळे आदी उपस्थित होते. या योजनेसंदर्भात जिल्ह्यातील तहसीलदारांनी अतिशय चांगले काम केले आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, गावागावातील इंग्रजकालीन पांदण रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन कामे त्वरीत सुरू करून घ्यावीत. अ, ब आणि क अशी वर्गवारी असलेली सर

पूरग्रस्तांच्या मदतीकरीता प्रशासनाकडून जीवनाश्यक वस्तूंचा साठा रवाना

Image
* जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी यवतमाळ दि.21 : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंची टंचाई जाणवत आहे. ही टंचाई दूर करण्यासाठी शासन, प्रशासन आणि इतर सामाजिक संघटनांच्या माध्यमातून मदतीचा ओघ सुरू आहे. याच अनुषंगाने यवतमाळ जिल्हा प्रशासनाच्यावतीने पूरग्रस्तांना मदत म्हणून जीवनावश्यक वस्तुंचा साठा जिल्हाधिकारी कार्यालयातून पाठविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी वस्तुंचा साठा असलेल्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवून सदर साठा पूरपिडीतांसाठी रवाना केला. राज्यातील पूरपिडीतांना सामाजिक संघटना आणि नागरिकांनी पुढे येऊन सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आवाहन केले होते. त्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात पुर मदत कक्ष स्थापन करण्यात आला. यात जिल्ह्यातील नागरिकांकडून, सामाजिक व इतर संस्थाकडून प्राप्त होणारी जीवनाश्यक वस्तू स्वरूपातील मदत स्विकारण्यात येत होती. यात जमा झालेल्या वस्तु ब्लँकेट्स 590 नग, गहू 850 किलो, तांदुळ 500 किलो, दाळ 200 किलो, तेल 80 किलो, साखर 400 किलो, बिस्कीट पुडे 250

पालकमंत्र्यांनी घेतला विविध विषयांचा आढावा

Image
       यवतमाळ दि.16 : नागरिकांना भौतिक सुविधा व शेतक-यांना पूरक व्यवसायाच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासंदर्भात करण्यात येणा-या उपायोजनांबाबत पालकमंत्री मदन येरावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यात बसस्थानकाचे नुतणीकरण, शेतक-यांना मत्स्यशेतीकरीता प्रोत्साहित करणे, 33 कोटी वृक्ष लागवड, बसस्थानक ते नागपूर बायपासपर्यंतचा मुख्य रस्ता आदी विषयांचा समावेश होता.             बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, सा.बा. विभागाचेअधिक्षक अभियंता धनंजय चामलवार, उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, के. अभर्णा, उपजिल्हाधिकारी सविता चौधर, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर, परिवहन मंडळाचे विभागीय नियंत्रक श्रीनिवास जोशी, कार्यकारी अभियंता शीतल गोंड, आगार व्यवस्थापक अविनाश राजगुरे आदी उपस्थित होते.             बसस्थानक नुतणीकरणाचे काम त्वरीत सुरू करण्यासाठी परिवहन मंडळाने तातडीने पाऊले उचलावी. यापूर्वीच वेळेत संपूर्ण प्रक्रिया परिवहन मंडळाने करणे अपेक्षित होते. नुतणीकरणाचे काम सुरू करण्यासाठी या मार्गावर असलेली वाहतूक पोलिस विभागाने इतरत्र वळवावी, अशा सुचना पालकमंत्र्या

लोकमान्य टिळक हे अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी - पालकमंत्री

Image
     v टिळकवाडी येथे लोकमान्यांच्या प्रतिमेचे व हायमास्ट लाईटचे लोकार्पण v पूरग्रस्तांसाठी विविध पतसंस्थांकडून धनादेश सुपुर्द यवतमाळ दि.16 : भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या बलिदानातून मिळालेल्या स्वराज्यचं सुराज्यात रुपांतर करणे ही आपली जबाबदारी आहे. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे, आणि तो मी मिळविणारचं’ अशी गर्जना देऊन लोकांच्या मनात स्वातंत्र्याची क्रांतीकारक मशाल पेटविण्याचे काम लोकमान्य टिळकांनी केले. पत्रकार, प्रखर देशभक्त, जहाल राष्ट्रवादी अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे ते ख-या अर्थाने धनी होते, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त टिळकवाडी येथे लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे व हायमास्ट लाईटचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी अनिल दंडे तर प्रमुख उपस्थिती म्हणून जेष्ठ मार्गदर्शक उमेश वैद्य, नगरसेवक अजय राऊत, जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे, राजू कावळे आदी उपस्थित होते. लोकमान्य टिळक दोन वेळा यवतमाळमध्ये आले, याचा उल्लेख करून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, या प

‘मिशन समृध्दी’ अंतर्गत 19 ग्रामपंचायतींचा सत्कार

Image
    यवतमाळ दि.16 : समुदाय सक्षमीकरण, मग्रारोहयो, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि आजिविका निर्मिती या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या तसेच इतरांना प्रेरणा देणा-या 19 ग्रामपंचायतींचा जिल्हा परिषद आणि मिशन समृध्दी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्यदिनी जिल्हा परिषद सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा माधुरी आडे तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प.समाजकल्याण सभापती प्रज्ञा भुमकाळे, राज्य नियोजन आयोगाचे सदस्य व्ही. गिरीराज, मिशन समृध्दीचे कार्यक्रम संचालक राम पप्पू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अरविंद गुडधे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) मनोज चौधर, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे डॉ. किशोर मोघे आदी उपस्थित होते. समुदाय सक्षमीकरणांतर्गत उत्कृष्ट कार्य कुंभारी ग्रामपंचायतीने केले असून डांगरगाव, नारळी, साकूर, पारडी कालेश्वर या ग्रामपंचायतींचा, मग्रारोहयो अंतर्गत प्रथम क्रमांक निगनुर ग्रामपंचायतीचा असून पिंपरी बोरी, बोरी (बु.), धानोरा, आवरगाव, जारुर, बोरीवन या ग्रामपंचायतींचा, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन अंतर्गत प्रथम क्रमांक सिंगलदेवी ग्रामप

पूरग्रस्तांच्या मदतीकरीता यवतमाळकरांनी समोर यावे

Image
v स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांचे आवाहन यवतमाळ दि.15 : गत आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आदी भागात महापूराचा प्रलय नागरिकांना वेदना देऊन गेला. संकटाच्या या काळात राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. पूरग्रस्त बांधवाच्या मदतीकरीता अनेक सामाजिक संघटना व नागरिक समोर आले आहे. यवतमाळकरांनीही या पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाकरीता मदतीचा हात समोर करावा, असे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात ध्वजारोहन करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर आदी उपस्थित होते. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित बांधव यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून सरकार विकासाच्या अनेक योजना राबवित आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, जिल्ह्यात विविध योजनांची प्रशासनाकडून प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे. शेतक-

टिपेश्वर पुनर्वसनासंदर्भात जिल्हाधिका-यांनी घेतली बैठक

Image
v गावक-यांचीही उपस्थिती यवतमाळ दि.8 : टिपेश्वर अभयारण्यासाठी जमिनी दिलेल्या गावक-यांचे योग्य पुनर्वसन व्हावे, त्यांना आवश्यक सोयीसुविधा, प्रकल्पग्रस्तांचे दाखले आदी बाबींची पुर्तता व्हावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी गावक-यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला पांढरकवडा वनविभागाच्या उपवनसंरक्षक के. अभर्णा, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) सविता चौधर, पांढरकवडाच्या प्र.उपविभागीय अधिकारी संगिता राठोड, घाटंजीच्या तहसीलदार पुजा माटोळे, सहाय्यक वनसंरक्षक प्रमोद पंचभाई, अंबादास सुरपाम आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, या गावातील तरुणांना वन विभागामार्फत गाईड म्हणून रोजगार व स्वयंरोजगार मिळविण्यासाठी संबंधित विभागाने नियोजन करावे. याबाबत गावक-यांनी पात्र असलेल्या युवक-युवतींची नावे कळवावीत. या गावात स्वत: धान्य दुकान देण्याबाबत जाहीरनामा काढावा, जेणेकरून गावक-यांना गावातच धान्याची उचल करता येईल. गावक-यांना देण्यात येणा-या रकमेचे धनादेश रक्कम प्राप्त होताच तात्काळ देण्यात यावे. वाढीव मोबदल

पिकांची पाहणी करण्याकरीता जिल्हाधिकारी ‘ऑनफिल्ड’

Image
v कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे एकीकृत व्यवस्थापन करण्याचे आवाहन यवतमाळ दि.7 : सुरूवातीला पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांची कपाशी पात्यावर व फुलावर आली आहे. यावर डोमकळी व गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने पिकांची पाहणी व याबाबत कृषी विभागाच्या उपाययोजना प्रत्यक्ष बघण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने ‘ऑनफिल्ड’ वर होते. यवतमाळ तालुक्यातील मौजे हिवरी येथील शेतकरी बबनराव चेके यांच्या शेतातील कापूस पिकांची त्यांनी यावेळी पाहणी केली. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ.सुरेश नेमाडे, शास्त्रज्ञ किटकशास्त्र डॉ.प्रमोद मगर, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे, तालुका कृषी अधिकारी निलेश ठोंबरे, मंडळ कृषी अधिकारी प्रभाकर राठोड, कृषी सहाय्यक श्रीमती बाळसराफ व ग्रामस्त तसेच शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी वेळीच जागृत राहून गुलाबी बोंडअळीचे एकीकृत व्यवस्थापन करावे. तसेच कृषी विभागाने याबाबत मोहीम स्वरुपात जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. कापूस पिक पात्यावर व फुलावर असता

ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानमुळे गावांच्या शाश्वत विकासाला दिशा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
v विश्रामगृहात केले वृक्षारोपण यवतमाळ दि.6 : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील एक हजार गावांचा विकास करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक गावात मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक कार्यरत आहेत. हे ग्राम परिवर्तक शासन, प्रशासन आणि जनता यातील दुवा म्हणून काम करीत आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद असून ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानमुळे गावांच्या शाश्वत विकासाला दिशा मिळाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, कॅबिनेट मंत्री संजय कुंटे पाटील, पालकमंत्री मदन येरावार, सहपालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, डीआरडीएचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी आदी उपस्थित होते. ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून गावांमध्ये सुरू झालेली कामे विशेष उल्लेखनीय आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकांचा विश्वास जिंकण्यास यामुळे मदत होईल. तसेच शाश्वत विकासाचे का

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक

Image
यवतमाळ, दि. 3 : जिल्हा नियोजन समिती अंतर्गत येणा-या जिल्हा वार्षिक योजना, सर्वसाधारण योजना व आदिवासी उपयोजना समितीची बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन सभागृह येथे घेण्यात आली. बैठकीला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके उपस्थित होते. यावेळी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, आमदार सर्वश्री निलय नाईक, ख्वाजा बेग, वजाहत मिर्झा, मनोहर नाईक, संजीवरेड्डी बोदकुरवार, राजू तोडसाम, राजेंद्र नजरधने, नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यपालन अधिकारी जलज शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीष शास्त्री, नियोजन समितीचे नामनिर्देशीत सदस्य डॉ. किशोर मोघे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर भोयर, नियोजन उपायुक्त श्री. खडसे आदी उपस्थित होते. आरोग्य विभागाचा आढावा घेतांना पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, जिल्ह्यात जेथे ओपीडी जास्त आहे, तेथे त्वरीत डॉक्टरांची नियुक्ती करावी. पिण्याचे शुध्‍द पाणी हा महत्वाचा विषय आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 14 वित्त आयोगातून वॉटर फिल्टर लावल्यास त्य

आदिवासी विकास मंत्र्यांच्या हस्ते उज्वला गॅस कनेक्शनचे वाटप

Image
        यवतमाळ दि.3 : पंडित दिनदयाल अंत्योदय योजनेच्या माध्यमातून बाभूळगाव येथील सांस्कृतिक भवनात आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते उज्वला गॅस कनेक्शन तसेच विधवा, निराधार  महिलांना प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी मंचावर नगराध्यक्ष प्रवीण गौरकर, पं.स.सभापती गौतम लांडगे, जि.प. समाजकल्याण सभापती प्रज्ञा भूमकाळे, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे,  सतीश मानलवार, बाजार समितीचे संचालक नितीन परडखे, मनोहर बुरेवार, नगरसेविका  पोहेकर, गजू पांडे आदी उपस्थित होते.         केंद्र व राज्य सरकारच्या योजनेची माहिती देताना आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले की, आदिवासींच्या विकासाकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळेच आदिवासी बांधव विकासापासून दूर राहिले. 1980 साली समाज कल्याण विभाग वेगळा झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तळागाळातील आदिवासींपर्यंत योजना पोहचविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न चालविले आहे. आदिवासींसाठी असलेल्या आर्थिक तरतुदी पैकी 50 टक्के रक्कम यापुढे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी खर्च करण्य

बळीराम ठाकरे यांचा मृतदेह लागला हाती

Image
v जिल्हा शोध व बचाव पथकाची कामगिरी यवतमाळ, दि. 2 : खुनी नदीच्या पात्रात वाहून गेलेल्या बळीराम ठाकरे यांचा मृतदेह अखेर हाती लागला आहे. जिल्हा शोध व बचाव पथकाच्या सदस्यांना ठाकरे यांचा मृतदेह तब्बल 35 तासांच्या सर्च ऑपरेशननंतर मिळाला. जिल्ह्यातील केळापुर तालुक्यातील मौजा कावठा येथील कालीदास बळीराम ठाकरे (वय 41) हे दि. 30 जुलै रोजी सायंकाळी 5.30 च्यासुमारास गावाशेजारील खुनी नदीच्या पुलावर फिरायला गेले. प्राप्त माहितीनुसार पुलावरून फिरत असतांना त्यांना अचानक भुरळ आली. यात त्यांचा तोल जाऊन ते खुनी नदीच्या पात्रात पडले व वाहून गेले. सदर घटनेची माहिती मिळताच केळापुरचे तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी घटनास्थळ गाठले व कालीदास ठाकरे यांचा स्थानिक भोई यांच्यामार्फत शोध घेण्याचा प्रयत्न केला.परंतु त्यात त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनी जिल्हा कार्यालयास शोध व बचाव पथकाची मागणी केली. जिल्हाधिकारी यांच्य आदेशान्वये जिल्हा शोध व बचाव पथक प्रमुख प्रशांत कमलाकर व किशोर भगत यांच्या नेतृत्वात 13 पोलीस कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले व शोध कार्याला सुरूवात केली. दि. 29 व 30 जुलैला केळापुर तालुक्य

खर्डा प्रकल्प व बेंबळा प्रकल्प पुनर्वसनसंदर्भात आदिवासी विकास मंत्र्यांनी घेतली आढावा बैठक

Image
v गावक-यांची उपस्थिती यवतमाळ, दि. 1 : बाभुळगाव तालुक्यातील खर्डा प्रकल्पात नवीन नियोजनानुसार प्रत्यक्ष बुडीत क्षेत्र सोडून इतर शेतजमीनीवर असलेले निर्बंध शिथिल करण्याबाबत तसेच बेंबळा प्रकल्पांतर्गत पुनर्वसनासंदर्भात आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी आढावा बैठक घेतली. महसूल भवन येथे आयोजित या बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, सिंचन विभागाचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काटपिल्लेवार, उपजिल्हाधिकारी सविता चौधर, संगिता राठोड, कार्यकारी अभियंता गणेश राठोड, जिल्हा परिषद सदस्य सुमित्रा कठाळे, बाभुळगाव पंचायत समिती सदस्य गौतम लांडगे आदी उपस्थित होते. खर्डा प्रकल्पासाठी शेतक-यांनी जमिनी दिल्या आहेत. मात्र या प्रकल्पाचे काम रखडले आहे, असे सांगून आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, हा प्रकल्प त्वरीत पूर्ण करावा, अशी गावक-यांची मागणी आहे. यामुळे गावाला सिंचनाची सोय उपलब्ध होईल. प्रकल्प पूर्ण न झाल्यामुळे शेतक-यांना स्वत:च्याच जमिनीसंदर्भात निर्णय घेता येत नाही. या प्रकल्पासाठी संग्राहक तलावासाठी आवश्यक असलेले प्रत्यक्ष बाधित क्षेत्र सोडून अतिरिक्त जमिनीसंदर्भात घालण्

रेशीम उत्पादनातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ

* धनादेशाचे त्वरीत वाटप यवतमाळ, दि. 01 : सन 2018-19 मध्ये मनरेगा अंतर्गत तुती लागवड उमरखेड, महागाव समुहात मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे जिल्ह्यात ‘सिल्क ॲन्ड मिस्क’ ची जोड लाऊन रेशीम उद्योग उभारीस आला. शेतकऱ्यांच्या इतर पिकाच्या पेरण्या संपेपर्यंत रेशीम उद्योजक शेतकऱ्यांनी किटक संगोपन घेण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत होणारी अंडीपूज शेतकऱ्यांनी मागणी केली व त्यांना पुरवठा करण्यात आला. सदर अंडीपूजची चौकी करून देण्यात आले. अंडीपूज घेणारे शेतकऱ्यांना केवळ 20 दिवसात कोस उत्पादन व रक्कम मिळाली आहे. यात यदुराज आनंदराव वानखेडे रा.ढाणकी. ता.उमरखेड यांनी 500 अंडीपूज घेऊन 516 कि.ग्रॅ. कोष काढले आहे. त्यांना सदर कोसाची रक्कम 1 लक्ष 71 हजार 224 मिळाले आहे. सुभाष गंगाधर कोरटवार रा. ढाणकी, ता.उमरखेड यांनी 250 अंडीपूज घेऊन 200 कि.ग्रॅ. कोष व रक्कम 59 हजार 016 रुपये मिळाले आहेत. प्रियदर्शनी प्रशांत शिराळे रा. धाणोरा यांनी 300 अंडीपूज घेऊन 224 कि.ग्रॅ. कोष व रक्कम 59 हजार 800 मिळाले आहेत. सन 2018-19 मध्ये टाकळी उमरखेड तालुक्यात मरसुळ, सुकळी, ढाकणी, वरूड, अकोली, कुपटी, भवानी, विडूळ, ब्राम्ह

बदलत्या काळाची आव्हाने स्वीकारून काम करा – जिल्हाधिकारी

Image
v महसूल दिनी अधिकारी, कर्मचा-यांचा सत्कार यवतमाळ, दि. 1 : महसूल विभागाकडे पाहण्याचा सामान्य नागरिकांचा दृष्टीकोन हा शासन म्हणून असतो. केवळ एकाच विषय नाही तर अनेक वेगवेगळे विषय या विभागात हाताळावे लागतात. या कामाच्या अनुभवातून वैयक्तिक विकास होण्यास मदत होते. त्यामुळे बदलत्या काळाची आव्हाने स्वीकारून अधिकारी व कर्मचा-यांनी काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अपर पोलिस अधिक्षक नरूल हसन, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, उपविभागीय अधिकारी सर्वश्री स्वप्नील तांगडे, व्यंकट राठोड, इब्राहिम चौधरी, स्नेहा उबाळे, माहिती व सुचना अधिकारी राजेश देवते, सेवानिवृत्त तहसीलदार डी.एम.झाडे, विष्णू कुळकर्णी आदी उपस्थित होते.   काळासोबत तंत्रज्ञान बदलत आहे. हे तंत्रज्ञान आत्मसाद करणे प्रत्येकाची गरज आहे, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, इतर विभागाचा नायक म्हणून महसूल विभाग कार्यरत असतो. केवळ महसूलीच कामे नाही तर शेती, उद्यो