पांदण रस्त्याच्या कामांना गती द्या - पालकमंत्री




v शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचा नियमित आढावा घेण्याच्या सुचना
यवतमाळ दि.22 : गावखेड्यांच्या दृष्टीने शासनाने सुरू केलेली पालकमंत्री पांदण रस्ता योजना अतिशय महत्वाची आहे. या योजनेशी संबंधित सर्व मान्यता स्थानिक स्तरावरच देण्याची तरतूद आहे. त्यामुळे कोणताही विलंब न करता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पादंण रस्त्यांच्या कामांना गती द्या, अशा सुचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, उपविभागीय अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, नगर पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, तहसीलदार शैलेश काळे, यवतमाळ नगर पालिकेचे मुख्याधिकारी अनिल अढागळे आदी उपस्थित होते.
या योजनेसंदर्भात जिल्ह्यातील तहसीलदारांनी अतिशय चांगले काम केले आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, गावागावातील इंग्रजकालीन पांदण रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन कामे त्वरीत सुरू करून घ्यावीत. अ, ब आणि क अशी वर्गवारी असलेली सर्व कामे वेळेत पूर्ण करा. मातीकाम, मजबुतीकरणाची कामे करण्यासाठी रोलर, जेसीबी आवश्यक आहे. प्रत्येक तालुक्यात पांदण रस्त्यांची कामे करण्यासाठी नागरिक उत्सुक आहेत. पालकमंत्री पांदन रस्ते योजनेसाठी संपूर्ण एका टिमचे गठण करा. तहसीलदारांनी कामांच्या याद्या बनवून दिल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात काम सुरू दिसले पाहिजे, अशा सुचना त्यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला दिल्या. तसेच शासनाच्या मागेल त्याला शेततळे, धडक सिंचन, पांदण रस्ते आदी महत्वाकांक्षी योजनांचा नियमित पाठपुरावा करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
यावेळी त्यांनी शहरातील घनकचरा प्रक्रियेबाबतसुध्दा आढावा घेतला. स्वच्छतेबाबत केंद्र सरकार अतिशय आग्रही आहे. यासाठी केंद्र शासनाकडून 14 व्या वित्त आयोगाचा निधी दिला जातो. शहरातील कच-याचे संकलन करून त्यावर प्रक्रिया करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. कच-यापासून खतनिर्मिती प्रकल्प जिल्ह्यातील सर्व पालिका स्तरावर राबविण्याचे नियोजन आहे. तयार झालेले हे सेंद्रीय खत थेट शासनाकडूनच खरेदी केले जाते. त्यामुळे वेगळे ग्राहक शोधण्याची गरज नाही, असेही पालकमंत्री म्हणाले.
००००००

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी