रेशीम उत्पादनातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ



* धनादेशाचे त्वरीत वाटप
यवतमाळ, दि. 01 : सन 2018-19 मध्ये मनरेगा अंतर्गत तुती लागवड उमरखेड, महागाव समुहात मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे जिल्ह्यात ‘सिल्क ॲन्ड मिस्क’ ची जोड लाऊन रेशीम उद्योग उभारीस आला. शेतकऱ्यांच्या इतर पिकाच्या पेरण्या संपेपर्यंत रेशीम उद्योजक शेतकऱ्यांनी किटक संगोपन घेण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत होणारी अंडीपूज शेतकऱ्यांनी मागणी केली व त्यांना पुरवठा करण्यात आला. सदर अंडीपूजची चौकी करून देण्यात आले. अंडीपूज घेणारे शेतकऱ्यांना केवळ 20 दिवसात कोस उत्पादन व रक्कम मिळाली आहे. यात यदुराज आनंदराव वानखेडे रा.ढाणकी. ता.उमरखेड यांनी 500 अंडीपूज घेऊन 516 कि.ग्रॅ. कोष काढले आहे. त्यांना सदर कोसाची रक्कम 1 लक्ष 71 हजार 224 मिळाले आहे.
सुभाष गंगाधर कोरटवार रा. ढाणकी, ता.उमरखेड यांनी 250 अंडीपूज घेऊन 200 कि.ग्रॅ. कोष व रक्कम 59 हजार 016 रुपये मिळाले आहेत. प्रियदर्शनी प्रशांत शिराळे रा. धाणोरा यांनी 300 अंडीपूज घेऊन 224 कि.ग्रॅ. कोष व रक्कम 59 हजार 800 मिळाले आहेत. सन 2018-19 मध्ये टाकळी उमरखेड तालुक्यात मरसुळ, सुकळी, ढाकणी, वरूड, अकोली, कुपटी, भवानी, विडूळ, ब्राम्हणगाव, पळशी, व बेलखेड, मुळीवा व महागाव तालुक्यातून अंबोडा,‍ शिरपूर, काहूरवाडी, खटका, करंजखेड आदी गावातील शेतकऱ्यांनी आतापर्यंत 55000-60000 अंडीपूज पुरवठा केला आहे.
सदर गावातून मोठ्या प्रमाणात शेतकरी कोष उत्पन्न घेत आहेत. इतर पिकापेक्षा रेशीम उद्योग एका महिन्यात पिक हाती येत असल्यामुळे शेतकऱ्यांना दुसरे पिक हाती येण्यापूर्वीच उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे महिन्याला नोकरी सारखा पैसा शेतकऱ्यांना मिळत आहे. महागाव उमरखेड समुहात रेशीम शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन, प्रशिक्षण व रेशीम अनुसंगीक माहिती समुह प्रमुख मुकुंद नरवाडे, वरिष्ठ तांत्रिक सहा तथा समुह प्रमुख पी.एम.चौगुले, रेशीम विकास अधिकारी महेंद्र ढवळे सहा संचालक वेळोवेळी शेतकऱ्यांना देत आहेत.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी