पूरग्रस्तांच्या मदतीकरीता प्रशासनाकडून जीवनाश्यक वस्तूंचा साठा रवाना




* जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी
यवतमाळ दि.21 : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंची टंचाई जाणवत आहे. ही टंचाई दूर करण्यासाठी शासन, प्रशासन आणि इतर सामाजिक संघटनांच्या माध्यमातून मदतीचा ओघ सुरू आहे. याच अनुषंगाने यवतमाळ जिल्हा प्रशासनाच्यावतीने पूरग्रस्तांना मदत म्हणून जीवनावश्यक वस्तुंचा साठा जिल्हाधिकारी कार्यालयातून पाठविण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी वस्तुंचा साठा असलेल्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवून सदर साठा पूरपिडीतांसाठी रवाना केला.
राज्यातील पूरपिडीतांना सामाजिक संघटना आणि नागरिकांनी पुढे येऊन सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आवाहन केले होते. त्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात पुर मदत कक्ष स्थापन करण्यात आला. यात जिल्ह्यातील नागरिकांकडून, सामाजिक व इतर संस्थाकडून प्राप्त होणारी जीवनाश्यक वस्तू स्वरूपातील मदत स्विकारण्यात येत होती. यात जमा झालेल्या वस्तु ब्लँकेट्स 590 नग, गहू 850 किलो, तांदुळ 500 किलो, दाळ 200 किलो, तेल 80 किलो, साखर 400 किलो, बिस्कीट पुडे 250 नग, ओआरएस लिक्विड 200 नग, साड्या 600 नग, औषधी 200 नग, बचाव साहित्य 4 मोठे दोरखंड, शर्ट व पॅन्ट 230 नग व इतर जीवनाश्यक साहित्य पूरपिडीतांसाठी पाठविण्यात आल्या आहेत. तसेच आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या खात्यामध्ये विविध सामाजिक संघटनांकडून जवळपास 15 लक्ष रुपये प्रशासनाच्यावतीने जमा करण्यात आले आहे.
याप्रसंगी उपजिल्हाधिकारी सविता चौधर पालवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मुन व जिल्हा शोध बचाव पथकातील पोलिस विभागाचे कर्मचारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी