बळीराम ठाकरे यांचा मृतदेह लागला हाती


v जिल्हा शोध व बचाव पथकाची कामगिरी
यवतमाळ, दि. 2 : खुनी नदीच्या पात्रात वाहून गेलेल्या बळीराम ठाकरे यांचा मृतदेह अखेर हाती लागला आहे. जिल्हा शोध व बचाव पथकाच्या सदस्यांना ठाकरे यांचा मृतदेह तब्बल 35 तासांच्या सर्च ऑपरेशननंतर मिळाला.
जिल्ह्यातील केळापुर तालुक्यातील मौजा कावठा येथील कालीदास बळीराम ठाकरे (वय 41) हे दि. 30 जुलै रोजी सायंकाळी 5.30 च्यासुमारास गावाशेजारील खुनी नदीच्या पुलावर फिरायला गेले. प्राप्त माहितीनुसार पुलावरून फिरत असतांना त्यांना अचानक भुरळ आली. यात त्यांचा तोल जाऊन ते खुनी नदीच्या पात्रात पडले व वाहून गेले. सदर घटनेची माहिती मिळताच केळापुरचे तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी घटनास्थळ गाठले व कालीदास ठाकरे यांचा स्थानिक भोई यांच्यामार्फत शोध घेण्याचा प्रयत्न केला.परंतु त्यात त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनी जिल्हा कार्यालयास शोध व बचाव पथकाची मागणी केली. जिल्हाधिकारी यांच्य आदेशान्वये जिल्हा शोध व बचाव पथक प्रमुख प्रशांत कमलाकर व किशोर भगत यांच्या नेतृत्वात 13 पोलीस कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले व शोध कार्याला सुरूवात केली.
दि. 29 व 30 जुलैला केळापुर तालुक्यात अतिविृष्टी झाली होती. खुनी नदीपात्रात पाणीसाठा अधिक असल्यामुळे जिल्हा शोध व बचाव पथकास मृतदेह शोधतांना अडथळा येत होता. परंतु पोलीस कर्मचारी यांना 35 तासांच्या अथक परिश्रमानंतर बळीराम ठाकरे यांचा मृतदेह शोधून काढण्यास यश आले.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी