Posts

Showing posts from 2015

जलयुक्त शिवार : धामणगावातील नाल्यांना आले नदीचे स्वरूप

Image
* धामनगाव देव येथे जलयुक्तमधून 32 बंधारे * आठ किमीचा नाला झाला नदीत रूपांतरीत        यवतमाळ, दि. 25: दारव्हा तालुक्यातील धामणगाव देव हे मुंगसाजी महाराजाच्या वास्तव्याने पावन झालेले जिल्ह्याचे एक महत्वाचे तिर्थक्षेत्र आहे. जलयुक्त शिवार अभियानातून मुंगसाजी महाराजांचे हे गाव आता जलयुक्त अभियानाचे जिल्ह्यातील प्रमुख गाव म्हणून ओळखू लागले आहे.           दारव्हा शहरापासून काहीच अंतरावर असलेल्या या गावात काही वर्षापूर्वी पंतप्रधान पॅकेजमधून 34 सिमेंटनाला बांध बांधण्यात आले होते. गावाशेजारी असलेल्या आणि शिवारातून आढेवेढे घेत जाणाऱ्या नाल्यांवर घेण्यात आलेले हे बंधारे गेल्या काही वर्षांपासून गाळाने भरून गेले होते. त्यामुळे या नाल्यांमध्ये पाणी कमी आणि गाळच अधिक अशी स्थिती काही वर्षात निर्माण झाली होती. त्यामुळे नाल्यात पाणी फार अल्प प्रमाणात साचून बाकी पाणी वाहून जात होते.           पालकमंत्री संजय राठोड यांनी हे गाव दत्तक घेतल्यानंतर गावातील या जुन्या बंधाऱ्यातील गाळ काढून खोलीकरणाचा व्यापक कार्यक्रम जलयुक्त शिवार अभियानातून घेण्यात आला. तब्बल 32 बंधाऱ्याची यासाठी निवड करण्यात