Posts

Showing posts from December, 2019

ध्वजदिन निधी संकलनासाठी सढळ हाताने मदत करा - जिल्हाधिकारी जलज शर्मा

Image
Ø ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा यवतमाळ ,   दि.   09 : कर्तव्य बजावत असतांना सिमेवर वीरमरण आलेल्या शहिदांच्या कुटुंबियांसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने अनेक योजना राबविण्यात येतात. त्यासाठी संपूर्ण देशात, राज्यात, जिल्ह्यात ध्वजदिन निधी संकलित केला जातो. शहिदांच्या कुटुंबियांसाठी राबविण्यात येणा-या या योजनांकरीता ध्वजदिन निधीच्या माध्यमातून सर्वांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने बचत भवन येथे आयोजित ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून पोलिस अधिक्षक मेघनादन राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, सा.बा.विभागाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, माजी कॅप्टन दिनेश तत्ववादी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धनंजय सदाफळ उपस्थित होते. ध्वजदिन निधी 2018 संकलनाचा शुभारंभ झाला, असे जाहीर करून जलज शर्मा म्हणाले, ध्वजदिन निधी संकलनात यवतमाळ जिल्हा हा अग्रेसर

आरोग्य विभागातार्फत एड्स प्रतिबंधकबाबत जनजागृती रॅली

Image
यवतमाळ दि. 04 : जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक यांच्या माध्यमातून जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी जनजागृती रॅलीस हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. यावेळी त्यांनी शपथेच्या माध्यमातून युवकांना एचआयव्हीबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले. सदर रॅलीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज तगडपल्लेवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बाळासाहेब चव्हाण, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ढोले तसेच अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचे डॉ. मनोज सक्तेपार, एआरटीचे विभागाचे डॉ. अविनाश बोरीकर उपस्थित होते. यवतमाळ शहरातील विविध संघटना, अशासकीय संस्था, आयएमए, निमा, रोटरी, लायन्स क्लब, फॅक्सी, वायओजीएस, संकल्प फाऊंडेशन, टिडीआरएफ, चाईल्ड लाईन कै. बाळासाहेब पांडे पतसंस्था यांचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी, रक्तपेढी विभाग तसेच ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट, आयटीआय कॉ

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व राष्ट्रीय निवृत्ती योजना सप्ताह

Image
* जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक यवतमाळ दि.01 : असंघटित कामगारांकरिता प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व लघु व्यापाऱ्यांकडून राष्ट्रीय निवृत्ती योजना सप्ताह 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. याबाबत प्रभारी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच आढावा बैठक घेतली. यावेळी सरकारी कामगार अधिकारी रा.रा. काळे यांनी दोन्ही योजनांबाबत माहिती दिली. तसेच नागरी सुविधा केंद्र (सीएससी) च्या माध्यमातून सादरीकरण केले. या योजनेत सर्व संघटित कामगार व किरकोळ व्यापारी / दुकानदार किंवा स्वयंरोजगार करणारा, बांधकाम कामगार, घरेलू कामगार, फेरीवाले, शेतमजूर, गृह उद्योगातील कामगार, माथाडी कामगार, बिडी कामगार, यंत्रमाग कामगार, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यासारख्या विविध व्यवसाय गटातील असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व लघू व्यापाऱ्यांकरीता राष्ट्रीय निवृत्ती योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत असंघटीत क्षेत्रातील पात्र कामगारांनी तसेच किरकोळ व्यापारी / दुकानदार आदींनी नोंदणी करावी, असे आवाहन

ढाणकी नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

* 29 डिसेंबर रोजी मतदान यवतमाळ दि. 01 : ढाणकी नगरपंचायतीचे अध्यक्ष व सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार रविवार दिनांक 29 डिसेंबर 2019 रोजी मतदान होणार आहे. ढाणकी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता बुधवार दिनांक 4 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता पासून ते 12 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाइटवर भरण्याकरिता उपलब्ध असेल. तर नामनिर्देशन पत्र दिनांक 4 ते 12 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येईल. रविवार व सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार नाही. नामनिर्देशन पत्रांची छाननी व वैधरित्या नामनिर्देशन झालेल्या उमेदवारांची यादी शुक्रवार दिनांक 13 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध करण्यात येईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम दिनांक बुधवार दिनांक 18 डिसेंबर 2019 आहे. अपील असल्यास अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या दिवशी किंवा तत्पूर्वी 20 डिसेंबर पर्यंत केली जाईल. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्य