आरोग्य विभागातार्फत एड्स प्रतिबंधकबाबत जनजागृती रॅली







यवतमाळ दि. 04 : जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक यांच्या माध्यमातून जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी जनजागृती रॅलीस हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. यावेळी त्यांनी शपथेच्या माध्यमातून युवकांना एचआयव्हीबाबत जनजागृती करण्याचे आवाहन केले.
सदर रॅलीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज तगडपल्लेवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बाळासाहेब चव्हाण, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ढोले तसेच अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचे डॉ. मनोज सक्तेपार, एआरटीचे विभागाचे डॉ. अविनाश बोरीकर उपस्थित होते. यवतमाळ शहरातील विविध संघटना, अशासकीय संस्था, आयएमए, निमा, रोटरी, लायन्स क्लब, फॅक्सी, वायओजीएस, संकल्प फाऊंडेशन, टिडीआरएफ, चाईल्ड लाईन कै. बाळासाहेब पांडे पतसंस्था यांचा सहभाग होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी, रक्तपेढी विभाग तसेच ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट, आयटीआय कॉलेज, ॲग्लो हिंदी कॉलेज, महात्मा फुले व सावित्री ज्योतिबा फुले समाजकार्य कॉलेज, नेहरू युवा केंद्र, जगदंबा फार्मसी कॉलेज कळंब, महिला अध्यापक विद्यालय जिल्हा परिषद कनिष्ठ विद्यालय, वाधवाणी फार्मसी कॉलेज, शिवाजी विद्यालय, वसंतराव नाईक कृषी विद्यालय तसेच जिल्हा शल्यचिकित्सक नर्सिंग स्कुल, गाडे पाटील, देवयानी, संजीवन, रुपेशकुमार इंगोले, ठाकरे मातोश्री, महाजन यश नर्सिंग, विनायकराव बापू नर्सिंग पडोळे नर्सिंग स्कूल यांनी परिश्रम घेतले. सदर रॅलीचे संचालन मनोज पवार व आभार पंकज वानखडे यांनी मानले.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी