Posts

Showing posts from July, 2017

शेतक-यांची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करा -पालकसचिव व्ही. गिरीराज

Image
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक यवतमाळ , दि. 29 : शेतक-यांसाठी राज्य शासन विविध योजना राबवित आहे. या योजनांचा लाभही शेतक-यांना मिळत आहे. अनेक छोट्या आणि परवडणा-या उपक्रमातून शेतक-यांना चांगले उत्पादन मिळू शकते. मात्र ही माहिती शेतक-यांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. तरच त्यांचे जीवनमान उंचावेल. याबाबत अधिका-यांनी गांभिर्याने लक्ष देऊन शेतीतील उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन अपर मुख्य सचिव (व्यय) तथा जिल्ह्याचे पालक सचिव व्ही. गिरीराज यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार सिंगला, सहायक जिल्हाधिकारी पंकज आशिया, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन उपस्थित होते. पालकसचिव व्ही. गिरीराज म्हणाले, कृषी विभागाने प्रत्येक गावातील शेतक-यांच्या उत्पादनाबाबत माहिती ठेवावी. शेततळे, नाला खोलीकरण, जलयुक्त शिवार आदी माध्यमातून त्या शेतक-यांच्या उत्पादनात किती वाढ झाली. कृषी सेवकांच्या माध्य

राष्ट्रीयकृत बँकांनी शेतक-यांबद्दल मानवीय दृष्टीकोन ठेवावा -किशोर तिवारी

Image
              जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली आढावा बैठक यवतमाळ , दि. 27 : शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. अडचणीच्या काळात शेतक-यांना दिलासा देण्यासाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरु केली आहे. या अंतर्गत दहा हजारांची अग्रीम रक्कम तात्काळ शेतक-यांना उपलब्ध करून देण्याचे शासनाचे आदेश आहेत. तरीसुध्दा राष्ट्रीयकृत बँका संथगतीने काम करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांनी शेतक-यांबद्दल मानवीय दृष्टीकोन ठेवून त्वरीत रक्कम उपलब्ध करून द्यावी, अशा सुचना वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बँक अधिका-यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अग्रणी बँक व्यवस्थापक कुमरे उपस्थित होते. बँकेत येणा-या शेतक-यांचे कर्जमाफी, अग्रीम रक्कम आदींबाबत समाधान करा, असे सांगून किशोर तिवारी म्हणाले, पात्र शेतक-यांना तात्काळ अग्रीम रक्कम देण्यात राष्ट्रीयकृत बँकांना काय अडचण आहे. शेतक-यांच्या जमिनीची किंमत कोटी रुपयांमध्ये

अतिसार नियंत्रण पंधरवाडा प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह

Image
यवतमाळ ,   दि.   25   :   सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. या दिवसात दुषित पाण्यामुळे अनेक रोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना उकळलेले पाणी द्यावे. तसेच जिल्हा आरोग्य विभागातर्फे 1 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान अतिसार नियंत्रण पंधरवाडा मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची आरोग्य विभागाच्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आरोग्य विभागाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.के.झेड. राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक टी.जी.धोटे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी डॉ.हर्षवर्धन बोरा, डॉ.अजय केशवाणी, जिल्हा आयुष अधिकारी डॉ.राजेश शाहू उपस्थित होते. अतिसार नियंत्रण पंधरवाड्यामध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी गावा-गावात जाऊन 0 ते 5 वयोगट असलेल्या कुटूंबाला ओआरएसचे पॉकेट तसेच झिंगच्या गोळ्या देणार आहे. या दिवसात पालकांनी उकळलेले पाणी थंड करून तसेच ओआरएस टाकून बालकांना द्यावे. गावासोबतच तांडा, वाडा, वस्त्या आदी ठिका

शेतक-यांनो चुका दुरुस्त करण्यासाठी चावडी वाचनात सहभागी व्हा -जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह

Image
रूई येथे संगणीकृत सातबारा चावडी वाचन कार्यक्रम यवतमाळ , दि. 25 : सातबारा हा शेतक-यांसाठी अत्यंत महत्वाचा दस्ताऐवज आहे. सुरवातीच्या काळात सातबारा हा हस्तलिखीत होता. काही वर्षांनंतर त्याचे पुनर्लेखन होत होते. तोपर्यंत त्यात असलेल्या चुका तशाच राहात होत्या. आता मात्र संगणीकृत सातबारा देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे मूळ सातबारा आणि संगणीकृत सातबारा यात तफावत असेल तर शेतक-यांनी लगेच महसूल यंत्रणेच्या निदर्शनास आणून द्यावे. त्यात त्वरीत दुरुस्ती केली जाईल. मात्र त्यासाठी शेतक-यांनी चावडी वाचनात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. रुई-वाई येथील नृसिंह मंदीर परिसरात आयोजित संगणीकृत सातबारा चावडी वाचन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहायक जिल्हाधिकारी पंकज आशिया, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार सचिन शेजाळ, रुईच्या सरपंचा रुपाली राऊत, उपसरपंच शाकीर काजी उपस्थित होते. दि. 1 ऑगस्ट 2017 पासून ऑनलाईन पध्दतीने शेतक-यांना सातबारा देण्यात येणार आहे, असे सांगून जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले, आज जवळपास सर्वांजवळ मोबाईल आहे. इंटरनेट

अमृत योजनेत अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर - पालकमंत्री मदन येरावार

Image
पिंपळगाव येथे पाण्याच्या टाकीचा बांधकाम पायाभरणी समारंभ यवतमाळ ,   दि.   23   :   शहरातील नागरिकांच्या पाण्याची समस्या कायमची निकाली काढण्यासाठी अमृत योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. दोन-अडीच वर्षांत किंवा त्यापूर्वीच शहर आणि शहरालगतच्या भागातील नागरिकांना 24 तास पाणी उपलब्ध होणार आहे. या अंतर्गत बांधण्यात येणा-या सर्व 19 टाक्यांमध्ये बेंबळा प्रकल्पातून पाणी भरण्याची सिस्टीम सुरु होईल. टाकी भरली की ती आपोआपच बंद होईल. त्यामुळे पाणी वाया जाणार नाही. या योजनेंतर्गत 4 मेगावॅटच्या सोलर सिस्टिमसाठीसुध्दा 20 एकर जागा घेण्यात आली आहे. अशा एक ना अनेक अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर अमृत योजनेत आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. शहरातलगत असलेल्या पिंपळगाव प्रभाग क्रमांक 4 येथे अमृत योजनेंतर्गत 5 लक्ष लीटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीच्या बांधकाम पायाभरणी समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषदेच्या अध्यक्षा कांचन चौधरी, मंचावर नगर परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता दिनेश बोरकर, उपअभिय

पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हा नियोजनाचा आढावा

Image
यवतमाळ ,   दि.   22   :   जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी आज (दि.22) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी महसूल राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री संजय राठोड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, आमदार सर्वश्री मनोहरराव नाईक, ख्वाजा बेग, राजू तोडसाम, संजीव रेड्डी बोतकुरवार, राजेंद्र नजरधणे, अशोक उईके, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार सिंगला, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार उपस्थित होते. पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, जिल्ह्यातील वैद्यकीय अधिका-यांची पदे जिल्हा पातळीवरच भरण्याचा धोरणात्मक निर्णय यवतमाळ जिल्ह्यात घेण्यात आला आहे. नागरिकांना होणा-या दुषित पाणी पुरवठा संदर्भात संबंधित अधिका-यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे. आपल्या जिल्ह्यात मत्सव्यवसाय वृध्दीसाठी काय करता येईल, याचा आराखडा तयार करून सादर करावा. शासकीय कामे मिळालेल्या कंत्राटदारांचा दर तीन महिन्यातून प्रगती अहवाल तपासावा. वीज चोरीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्यांना नोटीस बजावावी. जनसुविधा योजनेंतर्गत जिल्ह्यातील 151 ग्रा

समृध्द लोकशाहीसाठी मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभागी व्हा - जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह

Image
बापुजी अणे महिला महाविद्यालयात मतदार जनजागृती अभियान यवतमाळ ,   दि.   21   :   सामान्य नागरिक हा भारतीय लोकशाहीचा केंद्रबिंदू आहे. ही व्यवस्था आपल्यासाठी आहे. लोकशाहीची व्याप्ती खुप मोठी असून या माध्यमातून आपण आपला विकास करू शकतो. त्यामुळे देशाच्या समृध्द लोकशाहीसाठी तरुण-तरुणींनी   मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. लोकनायक बापुजी अणे महिला महाविद्यालयात आयोजित मतदार जनजागृती   व नोंदणी कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दिवाकर पांडे तर मंचावर उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार सचिन शेजाळ, नायब तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी रुपाली देहाळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दुर्गेश कुंटे उपस्थित होते. लोकशाहीमध्ये पुरुषांप्रमाणेच महिलांनाही समान अधिकार आहेत. शासन, प्रशासन स्तरावर महिलांना प्राधान्य दिले जाते. मात्र मतदार नोंदणी प्रक्रियेत महिलांची संख्या कमी पडत आहे. या महाविद्यालयात दोन हजार विद्यार्थीनी शिक्षण घेतात. या सर्व मुलींचा आवाज लोकशाहीत ब

मानवतेच्या दृष्टिकोनातून दिव्यांगांसाठी काम करा - पालकमंत्री मदन येरावार

Image
यवतमाळ दि. 21 : दिव्यांग व्यक्तिंना देवाने एक अवयव कमी दिला असला तरी त्यांना एक गुण अतिरिक्त असतो, असे मानले जाते. दिव्यांग व्यक्तिंच्या समस्यांबाबत विधानसभेत चर्चा केली जाते. या नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. सरकार, प्रशासन या आपली काळजी घेते, असा विश्वास दिव्यांग व्यक्तिंमध्ये निर्माण झाला पाहिजे. त्यासाठी अधिका-यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून काम करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग व्यक्तिंच्या समस्यांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी सचिंद्र   प्रताप सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले उपस्थित होते. दिव्यांग व्यक्तिंसाठी अनेक योजना आहेत असे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, दिव्यांगांसाठी कायद्याने तरतूद केलेली 3 टक्के रक्कम त्यांच्यासाठी खर्च झाली पाहिजे. या नागरिकांना आपण काय लाभ देऊ शकतो, याचा विचार अधिका-यांनी कराव. अपंग कल्याण महामंडळ, नगर पालिका प्रशासन, जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग यांनी समन्वयातून दिव्यांगांना लाभ द्यावा. य

भुमिगत विद्युत वाहिन्यांमुळे नागरिकांना सुरळीत सेवा मिळेल - पालकमंत्री मदन येरावार

Image
उपरीतार विद्युत मार्ग भुमिगत करण्याच्या कामाचे भुमिपूजन यवतमाळ ,   दि.   21   :   पावसाळ्याच्या दिवसात वीज, वादळी वारा, पाऊस या नैसर्गिक गोष्टींमुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होतो. शिवाय अपघात होण्याची शक्यतासुध्दा जास्त असले. त्यातच संपूर्ण शहरात उपरीतार विद्युत जोडण्या असल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. शहराचे हे बकालपण दूर करण्यासाठी तसेच ग्राहकांना अखंड, निरंतर आणि सुरळीत सेवा देण्यासाठी भुमिगत विद्युत वाहिन्यांचे काम हाती घेण्यात आले आहे, असे प्रतिपादन उर्जा, नवीन व नविकरणीय उर्जा राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. येथील विद्युत भवन कार्यालयात पायाभूत आराखडा योजनेंतर्गत शहरातील विविध ठिकाणच्या उपरीतार मार्ग उच्चदाब व लघुदाब वाहिन्या भुमिगत करण्याच्या कामाचे भुमिपूजन करतांना ते बोलत होते. यावेळी   मंचावर यवतमाळच्या नगराध्यक्षा कांचन चौधरी, अमरावती परिमंडळाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी, अधिक्षक अभियंता रामेश्वर माहुरे, अनिल वाकोडे, कार्यकारी अभियंता संजयकुमार चितळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड उपस्थित होते. शहरात आज पाणी पुरव

शेतकऱ्यांना अधिग्रहणाचा अधिक मोबदला मिळण्यासाठी प्रयत्न करणार - महसूल राज्यमंत्री संजय राठोड

Image
दिग्रस तालुक्यातील शेतकऱ्यांना जमीन अधिग्रहणाबाबतच्या प्रमाणपत्राचे वाटप यवतमाळ , दि. 15 : वर्धा – नांदेड रेल्वे मार्ग यवतमाळ जिल्ह्यातून जात आहे. यासाठी‍ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींचे अधिग्रहण करण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यातून रेल्वे जात आहे, याचा आनंद शेतकऱ्यांनासुध्दा आहे. मात्र त्यांना अधिक मोबदला मिळाला तर तो आनंद द्विगुणीत होईल. या रेल्वे प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहीत होत आहे त्यांना अधिक मोबदला मिळण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले. दिग्रस येथील तहसील कार्यालयात जमीन अधिग्रहणाबाबतच्या प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुसदचे उपविभागीय अधिकारी तथा भुसंपादन अधिकारी नितीनकुमार हिंगोले, रेल्वेचे अधिकारी तायडे उपस्थित होते. महसूल राज्यमंत्री संजय राठोड म्हणाले, प्रगतीसाठी रेल्वे आवश्यक आहे. मात्र शेतकऱ्यांवर अन्याय न होता त्या प्रमाणात भुसंपादनाचा मोबदला मिळाला पाहीजे. यासंदर्भात शेतकऱ्यांच्या काही तक्रार असल्यास संबंधित विभागाने सर्व तक्रारी एकत्रित करून प्रस्ताव पाठवावा. मा.मुख्यमंत्री व संबंधित
महाराष्ट्र शासन वृत्त क्र. 635                                         जिल्हा माहिती कार्यालय, यवतमाळ                              दि.13/07/20 17 राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा तात्काळ लाभ द्यावा - पालकमंत्री मदन येरावार जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला विविध विभागांचा आढावा यवतमाळ , दि. 13 : राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी योजना लागू केली आहे. योजना लागू होताच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत अवगत करून लाभार्थ्यांच्या अंतरीम याद्या वाचनाचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र याबाबत राष्ट्रीयकृत बँका संथगतीने काम करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळण्यास अडचण होत आहे.  राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफीचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त गिरीष सरोदे, जिल्हाधिकारी सचिंद्
Image
कर्जमाफी योजनेमुळे शेतकरी कर्जमुक्त होईल - पालकमंत्री मदन येरावार * पिंप्री बुटी येथे लाभार्थ्यांच्या अंतरीम यादीच्या वाचनाचा शुभारंभ यवतमाळ , दि. 13 : राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’ ही आजपर्यंतच्या इतिहासात अभुतपूर्व आहे. या कर्जमाफी योजनेत कुटूंबाची व्याख्या, आधारलिंक यासारखे पारदर्शक निकष असल्यामुळे खऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. एकप्रकारे ही कर्जमाफी योजना शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना ठरेल, असा विश्वास पालकमंत्री मदन येरावार यांनी व्यक्त केला. पिंप्री बुटी येथे ‘बँक आपल्या दारी’ या कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांच्या अंतरीम यादीच्या वाचन शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि पिंप्री बुटी ग्रामविविध कार्यकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे, माजी मंत्री संजय देशमुख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, समाजकल्याण सभापती प्रज्ञा भुमकाळे, शिक्षण व आरोग्य सभापती नंदिणी दरणे, बँकेच
Image
देशाच्या विकासासाठी छोटे कुटुंब ठेवणे आवश्यक - जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह * लोकसंख्या दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन यवतमाळ, दि. 11 : आज देशाची लोकसंख्या जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. वाढत्या लोकसंख्येचा  परिणाम देशाच्या विकासावर होतो. छोटे कुटुंब असले तर आपण आपल्या पाल्याला शैक्षणिक, आरोग्य तसेच  आदी सुविधा चांगल्याप्रकारे देऊ शकतो. परिणामी आपल्या कुटूंबाचा विकास होण्यास मदत होते. हीच बाब देशासाठीसुध्दा आवश्यक ठरत असल्यामुळे देशाच्या विकासासाठी कुटुंब छोटे ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्यावतीने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त येथील पोस्टल ग्राऊंडवर आयोजित जनजागरण रॅलीत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधूरी आडे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, पोलीस अधीक्षक एम.राजकूमार, नगर पालिकेच्या अध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, आरोग्य सभापती नंदिणी दरणे, समाजकल्याण सभापती प्रज्ञा भूमकाळे, जिल
Image
महाराष्ट्र शासन वृत्त क्र. 619                                         जिल्हा माहिती कार्यालय, यवतमाळ                              दि.10/07/20 17 12 जुलै रोजी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भात बैठक यवतमाळ, दि. 10 : समाजकल्याण विभागातर्फे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती / फ्री शीपच्या रकमा ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थी व महाविद्यालयाच्या बँक खात्यात जमा केली जाते. परंतु बंद खाते, चुकीचे खाते क्रमांक किंवा खात्यावरील नाव चुकीचे असणे, आयएफएससी कोड चुकीचे असल्याने सदर रकमा विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. याकरीता समाजकल्याण विभागातर्फे 12 जुलै रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. संबंधीत महाविद्यालयांचे प्राचार्य अथवा शिष्यवृत्ती विभाग हाताळणारे कर्मचाऱ्यांनी या बैठकीला हजर रहावे. तसेच विद्यार्थ्याच्या खात्यात रक्कम जमा न झाल्याची पडताळणी करून सुधारीत खाते क्रमांकाची यादी व पुराव्यासह उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 0000000 वृत्त क्र. 620 जागतिक लोकसंख्या दिनी रॅलीचे आयोजन यवतमाळ, दि. 10 : 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन