Posts

Showing posts from April, 2018

वृक्ष लागवड मोहिमेकरीता सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक - पालकमंत्री मदन येरावार

Image
   यवतमाळ, दि. 27 : दिवसेंदिवस कमी होणा-या वनांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यवतमाळकरांना तर याची चांगलीच जाणीव आहे. आजची भीषण पाणी टंचाई ही त्याचीच परिणीती आहे. वनांचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्य शासनाने यावर्षी 13 कोटी वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे. मात्र हे केवळ एकट्या वनविभागाचे काम नाही. तर या मोहिमेच्या यशस्वीकरीता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. 13 कोटी वृक्षलागवडीसंदर्भात नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित सर्व यंत्रणांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, मुख्य वनसंरक्षक पी.जी. राहूरकर, उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, अरविंद मुंढे, के.एम. अभर्णा उपस्थित होते. राष्ट्रीय वन नितीनुसार पर्यावरणाचे संतूलन साधण्यासाठी 33 टक्के भुभागावर जंगल असणे आवश्यक आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, मानवाने नैसर्गिक संपत्ती नष्ट केली आहे. त्याचे परिणाम आज आपण भोगत आहोत. वृक्षांना सगे-सोयरे म्हणायची

उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून रोगमुक्त समाजाची निर्मिती - पालकमंत्री मदन येरावार

Image
                             * वाघापूर, घोडखिंडी, भोसा, तळेगाव येथे लाभार्थ्यांना गॅसचे वाटप यवतमाळ, दि. 20 : इंधनासाठी जाळण्यात येणा-या लाकडापासून होणारे प्रदुषण हे जवळपास 400 सिगारेटच्या प्रदुषणाएवढे असते. चुलीच्या माध्यमातून होणा-या प्रदुषणामुळे संपूर्ण कुटुंब आरोग्याच्या विळख्यात सापडते. त्याचा परिणाम कुटुंब, समाज आणि देशावर होतो. कुटुंबाला धूरमुक्त करण्यासोबतच उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून रोगमुक्त समाजाची निर्मिती होईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. उज्वला दिनानिमित्त तालुक्यातील वाघापूर, घोडखिंडी, भोसा, तळेगाव येथे उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे वाटप करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, जि.प.सदस्या रेणू शिंदे, न.प.बांधकाम सभापती प्रवीण प्रजापती, नगरसेविका पुष्पा ब्राम्हणकर, किशोर जाजू, तहसीलदार सचिन शेजाळ आदी उपस्थित होते. 1 मे 2016 रोजी उत्तर प्रदेशच्या बलिया या जिल्ह्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरवात केली, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, राज्यात

बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी साधली आर्थिक प्रगती - केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर

Image
v महिला बचत गटांना चारचाकी मालवाहू वाहनाचे वाटप यवतमाळ, दि. 19 : आज देशातील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कौटुंबिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्यात बरोबरीने योगदान देत आहेत. त्यामुळे कधीकाळी पुरुष प्रधान असलेला देश आता महिला प्रधान झाला आहे. ग्रामीण भागात तर मोठ्या प्रमाणात महिला बचत गटांचे जाळे विणण्यात आले आहे. महिलांच्या सक्षमीकरणाकडे टाकलेले हे एक महत्वाचे पाऊल आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आपल्या संसाराला व आर्थिक प्रगतीला मोठा हातभार लावला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसरात अहीर यांनी केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने पांढरकवडा येथील जिड्डेवार भवनात आयोजित ग्राम संघांना वाहन वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार राजू तोडसाम, जिल्हा विकास व ग्रामीण यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी, राजेंद्र डांगे, संतोष चिंतावार, शंकर सामृतवार उपस्थित होते. ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून वाहने उपलब्ध करीत स्वत:च वाहनाचे चालकत्व स्वीकारले आहे, असे सांगून गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, आजच

उमरखेड शहरातील पाणी पुरवठ्यासाठी 52 कोटींची योजना - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
·         मागणीप्रमाणे घरांसाठी मान्यता ·         वर्धा-नांदेड रेल्वे प्रकल्पाला गती ·         वसंत कारखाना पुन्हा सुरू करू यवतमाळ, दि. 12 : नागरीकरणामुळे शहरांमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. उमरखेड येथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी इसापूर प्रकल्पातून पाणी पुरवठ्यासाठी 52 कोटी रूपयांची योजना मंजूर करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. उमरखेड नगर पालिकेच्यावतीने येथील सारडा जीन प्रांगणात आयोजित विविध विकासकामांच्या कोनशिलेचे अनावरण व भूमिपूजन मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार राजेंद्र नजरधने, डॉ. अशोक उईके, संजीवरेड्डी बोदकुरवार, राजेंद्र पाटणी, माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील, नगराध्यक्ष नामदेव ससाणे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील रोजगाराच्या संधींमुळे शहरांची लोकसंख्या वाढत आहे. राज्यातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. शहरांमधील पायाभूत सुविधांचे नियोजन नसल्यामुळे नागरी प्रश्न उभे

डॉ.बाबासाहेबांचे विचार सर्व समाजापर्यंत जाण्यासाठी उपयुक्त अंक

Image
  “ महामानवाला अभिवादन’’ लोकराज्य विशेषांकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन यवतमाळ दि.11 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुता आदी मुल्ये समाजात रुजविण्याचे महान कार्य केले आहे. डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने एप्रिल महिन्याचा ‘महामानवाला अभिवादनʼ लोकराज्य विशेषांक काढला आहे. बाबासाहेबांचे विचार सर्व समाजापर्यंत जाण्यासाठी हा अंक अतिशय उपयुक्त आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. नियोजन सभागृहात पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘महामानवाला अभिवादन’ या विशेषांकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य, विचार व आचारणावर प्रकाशित करण्यात आलेला लोकराज्यचा विशेषांक ख-या अर्थाने डॉ. बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाला मानवंदना आहे.

खरीप हंगामाच्या कर्जापासून एकही जण वंचित राहू नये - पालकमंत्री मदन येरावार

Image
                              v नियोजन सभागृहात जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक यवतमाळ, दि. 11 : खरीप हंगाम हा जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा हंगाम आहे. यावर्षी जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 2 हजार 78 कोटी कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 523 कोटी, राष्ट्रीयकृत बँका 1 हजार 341 कोटी, विदर्भ कोकण ग्रामीण बँक 157 कोटी आणि खाजगी बँकांना 55 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. खरीप हंगामाच्या कर्जासाठी बँकेकडे आलेल्या व्यक्तिला कर्ज मिळाले पाहिजे. एकही जण यापासून वंचित राहू नये, अशा सुचना जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. नियोजन सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते. यवतमाळ जिल्ह्यात जवळपास 9 लक्ष 10 हजार हेक्टरवर पीक लागवड केली जाते. खत, बियाणे आणि कर्जपुर

पालकमंत्र्यांच्या हस्ते सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन

Image
* विद्यार्थी व लाभार्थ्यांचा गौरव यवतमाळ, दि. 8 : राज्य शासनाच्यावतीने 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या दरम्यान सामाजिक न्याय विभागातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे या समता सप्ताहाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती प्रज्ञा भुमकाळे, प्रभारी जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर भोयर, जि.प.समाजकल्याण अधिकारी मंगला मून आदी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणातून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून भारतीय समाजामध्ये स्वातंत्र, समता व बंधुत्वाची भावना पोहोचविण्याचे महान कार्य केले आहे. शासनाने “ सबका साथ, सबका विकास ” या न्यायाने दुर्बल घटकांसाठी विविध योजनांची निर्मिती केली आहे. या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून तळागाळातील दुर्बल घटकांपर्यंत त्याचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रशास