बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी साधली आर्थिक प्रगती - केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर




v महिला बचत गटांना चारचाकी मालवाहू वाहनाचे वाटप
यवतमाळ, दि. 19 : आज देशातील महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कौटुंबिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्यात बरोबरीने योगदान देत आहेत. त्यामुळे कधीकाळी पुरुष प्रधान असलेला देश आता महिला प्रधान झाला आहे. ग्रामीण भागात तर मोठ्या प्रमाणात महिला बचत गटांचे जाळे विणण्यात आले आहे. महिलांच्या सक्षमीकरणाकडे टाकलेले हे एक महत्वाचे पाऊल आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आपल्या संसाराला व आर्थिक प्रगतीला मोठा हातभार लावला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसरात अहीर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने पांढरकवडा येथील जिड्डेवार भवनात आयोजित ग्राम संघांना वाहन वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार राजू तोडसाम, जिल्हा विकास व ग्रामीण यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी, राजेंद्र डांगे, संतोष चिंतावार, शंकर सामृतवार उपस्थित होते.
ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून वाहने उपलब्ध करीत स्वत:च वाहनाचे चालकत्व स्वीकारले आहे, असे सांगून गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, आजची ग्रामीण महिला जिद्द, परिश्रम आणि असामान्य कर्तृत्वाच्या माध्यमातून पुरुषप्रधान संस्कृतीवर मात करण्यात यशस्वी ठरली आहे. ही महिला क्षेत्रातील एक मोठी क्रांती आहे. चुली पासून सुरू झालेला हा प्रवास आता व्यापार व्यवसायपर्यंत पोहोचला आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यासारख्या अनेक महिला क्रांतीच्या आदर्श आहे. महाराष्ट्रातील बचत गटाची चळवळ संपूर्ण देशात यशस्वी ठरली आहे. आज ग्रामीण महिला बँकेचे व्यवहार करतात. हे विकासाच्या दिशेने उचललेले महत्वपूर्ण पाऊल आहे, असे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या आजिविका ग्रामीण एक्सप्रेस योजनेंतर्गत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते लिंगटी येथील तेजस्विनी महिला ग्राम संघाला प्रवासी सुप्रो, मुंजाळा येथील झाशीची राणी महिला ग्रामसंघाला बोलेरो पिकअप, बहात्तर येथील चंडिका माता महिला ग्रामसंघाला बोलेरो पिकअप, ससुरी येथील सावत्रीबाई फुले महिला ग्राम संघाला प्रवासी सुप्रो आणि मिरा येथील आशिर्वाद महिला ग्रामसंघाला बोलेरो पिकअप गाड्यांचे वाटप करण्यात आले. 
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सिंगलदिप येथील संघदिप महिला ग्रामसंघ (मध संकलन व्यवसाय), तेलंगटाकळी येथील सावत्रीबाई फुले महिला समूह (दालमिल), खैरगाव (दे.) येथील स्वामिनी महिला ग्रामसंघ (गृहउद्योग) यांना उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार देण्यात आला. तसेच उत्कृष्ट समूह संसाधन व्यक्ती (ICRP) म्हणून पंचफुला सोयाम, उत्कृष्ट पशुसखी म्हणून सिंधु रवींद्र चव्हाण, उत्कृष्ट कृषी सखी म्हणून पुजा कापडे, उत्कृष्ट मत्स सखी म्हणून माधुरी गजानन नान्हे यांनासुध्दा गौरविण्यात आले.
यावेळी सीमा जळके, शारदा नंदुरकार, अरुणा नैताम, पुष्पा गेडाम, शांताबाई धुर्वे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी