पालकमंत्र्यांच्या हस्ते सामाजिक समता सप्ताहाचे उद्घाटन



* विद्यार्थी व लाभार्थ्यांचा गौरव





यवतमाळ, दि. 8 : राज्य शासनाच्यावतीने 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या दरम्यान सामाजिक न्याय विभागातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे या समता सप्ताहाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती प्रज्ञा भुमकाळे, प्रभारी जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर भोयर, जि.प.समाजकल्याण अधिकारी मंगला मून आदी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणातून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून भारतीय समाजामध्ये स्वातंत्र, समता व बंधुत्वाची भावना पोहोचविण्याचे महान कार्य केले आहे. शासनाने सबका साथ, सबका विकास या न्यायाने दुर्बल घटकांसाठी विविध योजनांची निर्मिती केली आहे. या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून तळागाळातील दुर्बल घटकांपर्यंत त्याचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गांभिर्याने काम करावे. विद्यार्थी हा आपल्या देशाची राष्ट्रीय संपत्ती आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे गुण युवकांनी घेऊन राष्ट्रनिर्मितीमध्ये सहकार्य करावे. प्रत्येकाने आपली सामाजिक जाणीव लक्षात घेवून कार्य केल्यास डॉ.कलाम साहेबांचे महासत्येचे स्वप्न नक्कीच वास्तव्यास येईल, अशी आशा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या गौरव तसेच दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेंतर्गत जमीन वाटपाचे आदेश पालकमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा कांचन चौधरी आणि प्रभारी जिल्हाधिकारी चंद्रकात जाजू यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबाबत विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर भोयर यांनी केले. संचालन प्रा.कमल राठोड यांनी तर आभार समाजकल्याण अधिकारी मंगला मून यांनी मानले. यावेळी विशेष अधिकारी पियुष चव्हाण, कार्यालय अधीक्षक रविंद्र राऊत, पराग केळकर, प्रशांत साठे यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विजाभज आश्रम शाळेचे मुख्याध्यापक, कर्मचारी, महामंडळाचे सर्व अधिकारी व कर्मचारी, बुध्दिस्ट पेंशनर असोसिएसनचे पदाधिकारी, दलितमित्र पुरस्कार प्राप्त मान्यवर, विविध योजनेचे लाभार्थी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी