Posts

Showing posts from December, 2017

जिल्ह्यातील सिंचनासाठी दोन योजनांतून दीड हजार कोटी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
v शेतक-यांना अविरत वीज देण्याचे नियोजन v पात्र शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत कर्जमाफी योजना सुरू राहणार यवतमाळ, दि. 24 : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जलस्त्रोत आहेत. गोदावरी नदीचं जाळ, बेंबळा, अरुणावती, अडाण, पूस या नद्या जिल्ह्याची ओळख आहे. पूर्वी याचा उपयोग सिंचनासाठी केला गेला नाही. आता मात्र याच जलस्त्रोतांचा उपयोग करण्यात येईल. सिंचनासाठी दोन योजनांमधून दीड हजार कोटी खर्च करून जिल्ह्यातील शेतक-यांना दिलासा देण्याचे काम हे सरकार करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बाभुळगाव तालुक्यातील घारफळ येथे  केंद्र शासन पुरस्कृत “ बळीराजा जलसंजीवनी योजना ” कार्यान्वितीकरण कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भुपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, खासदार भावना गवळी, आमदार डॉ. अशोक उईके, संजीवरेड्डी बोदकुरव

शेतकरी केंद्रबिंदू मानून कृषी संशोधन होणे गरजेचे - राज्यपाल सी. विद्यासागर राव

Image
वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे लोकार्पण यवतमाळ, दि. 20 : भारत हा कृषीप्रधान देश आहे. पाच वर्षात शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. देशाच्या पतंप्रधानांनी “ पर ड्रॉप मोर क्रॉप ” चा नारा दिला आहे. या गोष्टी साध्य करण्यासाठी कृषी विद्यापीठांनी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून संशोधन करावे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठांतर्गत वसंतराव नाईक कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या नुतन वास्तुचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर कृषी व फलोत्पादन मंत्री पांडूरंग फुंडकर, पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, जिल्हा परिषद अध्यक्षा माधुरी आडे, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, सफाई कर्मचारी संघटनेचे रामोजी पवार, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले उपस्थित होते. विदर्भातील हे पहिले शासकीय कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय आहे, असे सांगून राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक य

शेतक-यांच्‍या समस्‍या शासन दरबारी मांडू - किशोर तिवारी

Image
Ø गुलाबी बोंडअळीच्‍या समस्‍येवर उपाय शोधण्‍यासाठी परिसंवाद यवतमाळ , दि. ७ :    कपाशीवर आलेल्‍या गुलाबी बोंडअळीमुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे . बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतक-यांच्‍या शेताचे सर्वेक्षण करण्‍याचे आदेशही शासनाने काढले आहे. शेतक-यांच्‍या ज्या काही समस्या असतील त्या शासन दरबारी मांडून सोडविण्‍याचा प्रयत्‍न करू , असे प्रतिपादन कै. वसंतराव नाईक शेती स्‍वावलंबन मिशनचे अध्‍यक्ष किशोर तिवारी यांनी केले. बळीराजा चेतना अभियान व कृषी विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने ‘ कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीचे व्‍यवस्‍थापन ’ या विषयावर जिल्‍हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयातील श्रोतृगृहात आयोजित परिसंवादात ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्रकाश पोहरे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्‍हा परिषदेचे उपाध्‍यक्ष श्याम जयस्‍वाल , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर , कापूस संशोधन केंद्राचे शास्‍त्रज्ञ डॉ. विश्‍लेश नगराळे , डॉ. नेमाडे , कृषी विकास अधिकारी कैलास वानखेडे , प्रगतशील शेतकरी अमृत देशमुख , अॅड. पाटील उपस्थित होते. खरीप हंगामात कापूस पिकावर

ध्वजदिन निधीसाठी सर्वांनी मदत करावी - जिल्हाधिकारी डॉ. देशमुख

Image
ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा यवतमाळ, दि. 7 : महाराष्ट्राला शौर्याची मोठी परंपरा आहे. यात अनेकांना वीरमरण आले आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील 17 जवान आपले कर्तव्य बजावत असतांना देशासाठी शहीद झाले. त्यांच्या पश्चात वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे जीवन सुसह्य व्हावे, याकरीता ध्वजदिन निधीसाठी सर्वांनी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.             जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फेत आयोजित “ सशस्त्र सेना ध्वजदिन ” निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम व माजी सैनिक मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर निवृत्त कॅप्टन दिनेश नारायण तत्ववादी, अपर पोलिस अधिक्षक अमरसिंह जाधव, अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस.एस. मुद्दमवार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी धनंजय सदाफळ, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी उपस्थित होते.             जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत माजी सैनिक तसेच सैनिकांच्या कुटुंबाकरीता अनेक

काश्मिरमध्ये भारतावर प्रेम करणारा वर्ग मोठा - केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर

Image
यवतमाळ, दि. 3 : जम्मू-काश्मिर हे भारताचे अविभाज्य अंग आहे. आपल्या सुरक्षा यंत्रणा अतिशय बिकट परिस्थितीमध्ये दहशतवाद्यांशी लढा देत आहे. सैन्याचे अधिकारी तसेच स्थानिक पोलिसांचे यात मोठे योगदान आहे. स्थानिक पोलिसांमध्ये जास्तीत जास्त जवान मुस्लीम समाजाचे आहेत. आपल्या मातृभुमीच्या सेवेसाठी ते सदैव तत्पर असतात. त्यांच्या देशभक्तीला सलामच केला पाहिजे. एवढेच नाही तर काश्मिरमध्ये भारतावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी केले. यवतमाळ येथील “ वायझेड ” या वृत्तवाहिनीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, नगराध्यक्षा कांचन चौधरी, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे उपस्थित होते. गत काही महिन्यांपासून काश्मिरमध्ये दगडफेक कमी झाली आहे, असे सांगून गृहराज्यमंत्री अहीर म्हणाले, दहशतवादी किंवा त्यांचे समर्थक जुन्या चित्रफिती दाखवून स्थानिकांना भडकविण्याचे प्रयत्न करीत असतात. प्रसार माध्यमांतून बरेचदा काश्मिरबाबत जे दाखविले जाते ते पूर्ण सत्य असेलच असे नाही. कधीकधी अतिरंजीत दाखविण्याचा प्रयत्न होतो. काश्मिरच्या

समाजाला अपेक्षित बाबी आणि वास्तविकता लोकांपर्यंत पोहचवा - पालकमंत्री येरावार

Image
यवतमाळ, दि. 3 : भारतीय लोकशाहीत प्रसार माध्यमांना विशेष स्थान आहे. प्रिंट मिडीयाची जागा आज काही प्रमाणात इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी घेतली आहे. हे ज्ञानाचे भांडार आहे. जनतेचा आवाज यातून बुलंद होतो. मात्र आज चमचमीत बातम्यांना प्राधान्य आले आहे. त्यामुळे समाजाला अपेक्षित बाबी आणि वास्तविकता माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. “ वायझेड ” वृत्तवाहिनीच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख उद्घाटक म्हणून केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर तर प्रमुख अतिथी म्हणून मंचावर नगराध्यक्षा कांचन चौधरी, माजी मंत्री तथा वायझेड वृत्तवाहिनीचे संचालक राजाभाऊ ठाकरे उपस्थित होते. प्रसार माध्यमांनी आपले मत सैदव मांडले पाहिजे, असे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करतांना चांगल्या गोष्टीसुध्दा लोकांसमोर जायला पाहिजे. वृत्तपत्रांमधून जनतेचा आवाज बुलंद होत असतो. वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिनी हे एक पक्षाची किंवा एका विचाराची नसते. ती जनतेची असते. याचा व्याप मोठा आहे. एकप्रकार

राज्यात आदर्शवत रस्ते बांधण्याला प्राधान्य - ना. चंद्रकांत पाटील

Image
Ø अभियंत्यांसोबत साधला सुसंवाद Ø सामाजिक बांधिलकी जोपासून काम करण्याचा सल्ला यवतमाळ, दि. 3 : रस्ते हे विकासाचे केंद्रबिंदू आहे. नागरिकांना ज्या मुलभुत गरजांची आवश्यकता असते, त्या रस्त्यांचाही समावेश होतो. रस्ते पाहून लोकांकडूनच कौतुकाची थाप मिळाली पाहिजे, असे आदर्शवत रस्ते बांधण्याला सरकारचे प्राधान्य आहे. त्यासाठी विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्या सहकार्याने हे कार्य पार पाडले जाईल, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम, महसूल तसेच मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.             जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात अभियंत्यांसह सुसंवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर पालकमंत्री मदन येरावार, आमदार डॉ. अशोक उईके, राजेंद्र नजरधने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य प्रादेशिक अभियंता चंद्रशेखर तुंगे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अधिक्षक अभियंता शशिकांत सोनटक्के उपस्थित होते.             सार्वजनिक बांधकाम विभाग हे शासनाचे प्रमुख अंग आहे, असे सांगून ना. चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रत्येक जिल्हास्तरावर जाऊन विभागातील अधिकारी-क