Posts

Showing posts from May, 2021

२ जून पासून अत्यावश्यक सेवेसोबतच इतर दुकानेही सकाळी ७ ते २ पर्यंत चालू ठेवण्यास परवानगी

  जिल्हाधिकारी यांचे नवीन आदेश जारी यवतमाळ दि, 31 (जिमाका):-   जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेसोबत इतर सेवेची दुकाने २ जून पासून १५   जून सकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून सदर दुकाने सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. केवळ कृषिशी संबंधित दुकाने 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने शनिवार आणि रविवार बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत.   ब्रेक दि चेन अंतर्गत घालून दिलेले निर्बंध दिनांक ०१ जून, २०२१ रोजी जश्याच्या तश्या लागू राहणार असून केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ७.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत सर्व निर्बंधांसाह   सुरु राहतील. 2 जून पासून सुरू असलेल्या सेवा १. सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई इ. खाद्य पदार्थाची दुकाने (ज्यामध्ये चिकन,मटन, मच्छी आणि अंडयांची दुकाने) आठवडयाची सातही दिवस सकाळी ७.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. २. अत्यावश्यक सेवेत मोडत नाहीत अशी एक

24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे जास्त

  * 118 पॉझेटिव्ह, 330 कोरोनामुक्त, 7 मृत्यु * जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 1809 बेड उपलब्ध              यवतमाळ, दि. 28 : गत 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण जास्त आहे. जिल्ह्यात 118 जण पॉझेटिव्ह तर 330   जण कोरोना मुक्त झाले असून सात जणांचा मृत्यु झाला. यातील दोन मृत्यु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, तीन मृत्यू डीसीएचसी तर दोन मृत्यु खाजगी रुग्णालयातील आहे.                जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 4959 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 118 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4841जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2041 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 867 तर गृह विलगीकरणात 1174 रुग्ण आहेत. तसेच आता पर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 71544 झाली आहे. 24 तासात 330 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 67750 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1753 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 8 हजार 142 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 34 हजार 584 निगेटिव्ह आ

24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे दुप्पट

  * 144 पॉझेटिव्ह, 289 कोरोनामुक्त, 4 मृत्यु * जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 1758 बेड उपलब्ध              यवतमाळ, दि. 27 : गत 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण जास्त आहे. जिल्ह्यात 144 जण पॉझेटिव्ह तर 289    जण कोरोनामुक्त झाले असून चार जणांचा मृत्यु झाला. यातील दोन मृत्यु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, तर दोन मृत्यु खाजगी रुग्णालयातील आहे.                जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 5296 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 144 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5152 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2261 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1064 तर गृह विलगीकरणात 1197 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 71426 झाली आहे. 24 तासात 289 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 67420 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1745 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 2 हजार 463 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 29 हजार 742 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्

24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे तिप्पटीने जास्त

  Ø 167 पॉझेटिव्ह, 507 कोरोनामुक्त,   12 मृत्यु Ø जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 1605 बेड उपलब्ध              यवतमाळ, दि. 25 : गत 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे तिप्पटीने जास्त आहे. जिल्ह्यात 167 जण पॉझेटिव्ह तर 507 जण कोरोनामुक्त झाले असून बारा जणांचा मृत्यु झाला. यातील पाच मृत्यु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, डीसीएचसीमध्ये तीन मृत्यु तर चार मृत्यु खाजगी रुग्णालयातील आहे.                जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 5469 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 167 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5302 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2532 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1275 तर गृह विलगीकरणात 1257 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 71121 झाली आहे. 24 तासात 507 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 66856 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1733 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.11, मृत्युदर 2.43 आहे.              शासकीय वै

म्युकरमायकोसीस हा संसर्गजन्य आजार नाही

Image
Ø शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांनी त्वरीत रिपोर्टींग करण्याचे निर्देश Ø लक्षणे आढळताच उपचार घेण्याचे आवाहन             यवतमाळ, दि. 24 : कोव्हीडचा प्रादुर्भाव हा एकमेकांच्या संपर्कात आल्याने होत असला तरी कोव्हीड पश्चात होणारा म्युकरमायकोसीस हा आजार संसर्गजन्य नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता लक्षणे आढळताच त्वरीत वैद्यकीय उपचार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.             नियोजन सभागृहात म्युकरमायकोसीसबाबत आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हरी पवार, आयएमएचे अध्यक्ष डॉ. जोशी आदी उपस्थित होते.             म्युकरमायकोसीसकरीता वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला असून खाजगी रुग्णालयात सुध्दा या आजाराचे रुग्ण आढळत आहे. शासकीय तसेच खाजगी रुग्णालयांनी म्युकरमायकोसीसच्या रुग्णांबाबत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडे रिपोर्टींग करावी. जेणेकरून त्या प्रमाणात ‘ॲम्पोटेरेसीन बी’ हे इंज

24 तासात 245 पॉझेटिव्ह, 416 कोरोनामुक्त

Ø एकूण सहा मृत्यु Ø जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 1494 बेड उपलब्ध             यवतमाळ, दि. 24 : गत 24 तासात जिल्ह्यात 245 जण पॉझेटिव्ह तर 416 जण कोरोनामुक्त झाले असून सहा जणांचा मृत्यु झाला. यातील चार मृत्यु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, तर दोन मृत्यु खाजगी रुग्णालयातील आहे.               जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार सोमवारी एकूण 5278 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 245जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5033 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2884 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1547 तर गृह विलगीकरणात 1337 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 70954 झाली आहे. 24 तासात 416 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 66349 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1721 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.11, मृत्युदर 2.43 आहे.             शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ तालुक्यातील 71 वर्षीय पुरुष, दारव्हा येथील 70 वर्षीय पुरुष, मारेगाव येथील 60 वर

म्युकरमायकोसीस बरा होऊ शकतो

Ø त्वरीत उपचार घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन यवतमाळ, दि. 22 : म्युकरमायकोसीस हा एक जलद पसरणारा बुरशीचा रोग असून मुख्यत: नाक, डोळे आणि मेंदूला बाधित करतो. या रोगावर वेळीच उपचार केल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र उपचार करण्यास टाळाटाळ केल्यास रुग्णाचा डोळा, दृष्टी किंवा जीव जाण्याचासुध्दा धोका असतो. त्यामुळे म्युकरमायकोसीसची लक्षणे आढळल्यास त्वरीत उपचार घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. म्युकरमायकोसीसची लक्षणे : या रोगाची लक्षणे पुढीलप्रमाणे आहे. चेह-याचे स्नायू दुखणे, चेह-यावर बधिरपणा येणे, अर्धशिशी (डोक्याची एक बाजू दुखणे), नाक चोंदणे, नाकावर सूज येणे, एका नाकपुडीतून रक्तस्त्राव, काळपट स्त्राव येणे, चेहरा अथवा डोळ्यावर सूज येणे, एक पापणी अर्धी बंद होणे, डोळा दुखणे, वरच्या जबड्याचे दात दुखणे किंवा हलू लागणे, अस्पष्ट दिसणे, ताप येणे. काय करावे (प्रतिबंधात्मक उपाय) : रक्तातील साखरेवर काटेकोरपणे नियंत्रण ठेवणे, कान, नाक, घसा, नेत्र व दंत तज्ज्ञाकडून एका आठवड्यानंतर तपासणी करणे, वरील लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क करणे, डॉक्टरांनी सांगितल्यापेक्षा जास्त द

24 तासात 288 पॉझेटिव्ह, 443 कोरोनामुक्त

  Ø   एकूण 13 मृत्यु      Ø जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 1383 बेड उपलब्ध यवतमाळ, दि. 22 : गत 24 तासात जिल्ह्यात 288 जण पॉझेटिव्ह तर 443 जण कोरोनामुक्त झाले असून 13 जणांचा मृत्यु झाला. यातील 11 मृत्यु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, तर दोन मृत्यु खाजगी रुग्णालयातील आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शनिवारी एकूण 6894 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 288 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 6606 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3371 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1714 तर गृह विलगीकरणात 1657 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 70387 झाली आहे. 24 तासात 443 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 65316 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1700 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.24, मृत्युदर 2.42 आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये नेर येथील 51 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 52 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष, दारव्हा येथील 26, 62 वर्षीय पुर

म्युकरमायकोसीसबाबत काळजी घेण्याचे आवाहन

  यवतमाळ, दि. 21 : ब्लॅक फंगस किंवा काळी बुरशी या नावाने ओळखला जाणारा ‘म्युकरमायकोसीस’ हा आजार बुरशीजन्य सुक्ष्म जंतुमुळे होतो. सध्या या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे निदर्शनास येत असून नागरिकांनी लक्षणे आढळताच वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाने केले आहे. कोणाला होतो हा आजार : रोगप्रतिकार शक्ती कमी असणे, मधूमेह, कोरोनारुग्ण, जंतुसंसर्ग असणा-यांना तसेच अवयव प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांना आणि कर्करोग असणा-या रुग्णांचा म्युकरमायकोसीस होण्याची शक्यता असते. आजाराची लक्षणे : डोळ्या व नाकाभोवती दुखणे व लाल होणे, ताप, नाकातून रक्तस्त्राव, डोकेदुखी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, रक्ताच्या उलट्या, दात दुखणे, जबड्यावर सुज येणे, लकवा, मिरगी. कसा होतो हा संसर्ग : रुग्णालयात ऑक्सीजन देतांना ह्युमीडीफायर बॉटलमध्ये डिस्टील वॉटर भरणे आवश्यक असते. तसेच एसी वेळोवेळी स्वच्छ व निर्जंतणूक करणे आवश्यक आहे.कोरोना रुग्णाच्या घरातून सुध्दा हा संसर्ग होऊ शकतो. काय करावे : लक्षणे दिसू लागताच त्वरीत नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा. डायबिटीज कंट्रोल ठेवणे,

24 तासात 355 पॉझेटिव्ह, 463 कोरोनामुक्त

  Ø   एकूण 7 मृत्यु       Ø जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 1361 बेड उपलब्ध यवतमाळ, दि. 21 : गत 24 तासात जिल्ह्यात 355 जण पॉझेटिव्ह तर 463 जण कोरोनामुक्त झाले असून 7 जणांचा मृत्यु झाला. यातील चार मृत्यु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, एक मृत्यु डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये तर दोन मृत्यु खाजगी रुग्णालयातील आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 7231 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 355 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 6876 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3539 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1742 तर गृह विलगीकरणात 1797 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 70099 झाली आहे. 24 तासात 463 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 64874 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1687 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.35, मृत्युदर 2.41 आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 53 व 72 वर्षीय पुरुष, बाभुळगाव तालुक्यातील 53 वर्षीय पुरुष

जिल्ह्यातील शेतक-यांना वेळेवर खते उपलब्ध करून द्या - जिल्हाधिकारी येडगे

Image
  Ø   खतांच्या संरक्षित साठ्याबाबत जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक यवतमाळ, दि. 20 : शेतक-यांच्या मागणीप्रमाणे वेळेवर युरीया खताचा पुरवठा व्हावा, यासाठी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाबरोबरच आता विदर्भ को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनला देखील युरीयाचा संरक्षित साठा करण्यासाठी नोडल एजंन्सी म्हणून मान्यता देण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यासाठी 6460  मे.टन संरक्षित साठ्याचे (बफर स्टॉक) लक्षांक आहे. त्यामुळे शेतक-यांना वेळेवर खते उपलब्ध होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात खतांच्या संरक्षित साठ्याबाबत जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जि.प. कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, विक्रेता संघाचे अध्यक्ष संजय पाळलेकर, विदर्भ को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा व्यवस्थापक अमोल राजगुरू, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापक एम.पी. गावंडे, डी.एस.आवारे, प्रसाद फांजे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात संरक्षित साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असला पाहिजे, अ

जिल्ह्यात 353 जण पॉझेटिव्ह, 625 कोरोनामुक्त

  Ø   16 मृत्यु      यवतमाळ, दि. 19 : गत 24 तासात जिल्ह्यात 353 जण पॉझेटिव्ह तर 625 जण कोरोनामुक्त झाले असून 16 जणांचा मृत्यु झाला. यातील नऊ मृत्यु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, दोन मृत्यु डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये तर पाच मृत्यु खाजगी रुग्णालयातील आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 6937 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 353 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 6584 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4048 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2020 तर गृह विलगीकरणात 2028 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 69301 झाली आहे. 24 तासात 625 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 63587 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1666 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.54 , मृत्युदर 2.40 आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 75, 76 वर्षीय पुरुष तालुक्यातील 80 वर्षीय पुरुष, वणी येथील 68 वर्षीय महिला, तालुक्यातील 60 वर्षीय महिला, नेर येथील 79 व

जिल्हाधिका-यांची सावरगड, रामपूर, पारवा, शिबला येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

Image
  Ø   लसीकरणाची पाहणी व यंत्रणेचा आढावा यवतमाळ, दि. 18 : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसंदर्भात तालुका प्रशासनाने केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सावरगड, रामपूर, पारवा आणि झरीजामणी तालुक्यातील शिबला येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व जांब येथील आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पांढरकवडा येथील आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते. सर्वप्रथम जिल्हाधिका-यांनी सावरगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली.   यानंतर घाटंजी तालुक्यातील रामपूर व पारवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन कोरोनाबाधित रुग्ण व लसीकरण बाबत पाहणी केली. तसेच जांब येथील आश्रम शाळेला भेट देऊन कोव्हीड केअर सेंटरबाबत नियोजन करण्याच्या सुचना दिल्या. पांढरकवडा येथे तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी म्हणाले, आपापल्या कार्यक्षेत्रातील ग्रामस्तरीय समित्या सक्रीय करा. मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी पॉझेटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा त्