24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे तिप्पटीने जास्त

 


Ø 167 पॉझेटिव्ह, 507 कोरोनामुक्त,  12 मृत्यु

Ø जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 1605 बेड उपलब्ध

            यवतमाळ, दि. 25 : गत 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे तिप्पटीने जास्त आहे. जिल्ह्यात 167 जण पॉझेटिव्ह तर 507 जण कोरोनामुक्त झाले असून बारा जणांचा मृत्यु झाला. यातील पाच मृत्यु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, डीसीएचसीमध्ये तीन मृत्यु तर चार मृत्यु खाजगी रुग्णालयातील आहे. 

            जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 5469 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 167 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5302 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2532 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1275 तर गृह विलगीकरणात 1257 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 71121 झाली आहे. 24 तासात 507 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 66856 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1733 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.11, मृत्युदर 2.43 आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये दिग्रस तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, यवतमाळ तालुक्यातील 63 वर्षीय महिला, बाभुळगाव येथील 40 वर्षीय महिला, कळंब तालुक्यातील 68 वर्षीय पुरुष आणि आर्णि 65 पुरुष आहे. डीसीएचसीमध्ये मृत झालेल्यांमध्ये उमरखेड तालुक्यातील 50 वर्षीय महिला, महागाव तालुक्यातील 63 वर्षीय पुरुष, दिग्रस तालुक्यातील 75 वर्षीय महिला, तर खाजगी रुग्णालयात बाभुळगाव तालुक्यातील 87 वर्षीय पुरुष, महागाव येथील 78 वर्षीय पुरुष, दारव्हा येथील 72 वर्षीय पुरुष आणि पांढकरवडा येथील 34 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला.

            मंगळवारी पॉझेटिव्ह आलेल्या 167 जणांमध्ये 105 पुरुष आणि 62 महिला आहेत. यात आर्णी येथील 6, बाभुळगाव येथील 3, दारव्हा येथील 4, दिग्रस येथील 14, घाटंजी येथील 8, कळंब येथील 6, महागाव येथील 6, मारेगाव येथील 31, नेर येथील 7, पुसद येथील 17, राळेगाव 3, उमरखेड 5, वणी येथील 15, यवतमाळ 24, झरीजामणी 15 आणि इतर शहरातील 3 रुग्ण आहे.  सुरवातीपासून आतापर्यंत 592535 नमुने पाठविले असून यापैकी 589909 प्राप्त तर 2626 अप्राप्त आहेत. तसेच 518788 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

            जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 1605 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 674 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 1605 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 191 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 386 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 153 रुग्णांसाठी उपयोगात, 373 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 330 उपयोगात तर 846 बेड शिल्लक आहेत. 

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी