पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा मुख्यालयी ध्वजारोहण

 





Ø शहरातील स्त्री रुग्णालयाची पाहणी

यवतमाळ, दि. 1 : महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जि. प. अध्यक्षा कालिंदा पवार, नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, उपजिल्हाधिकारी सविता चौधर काही निवडक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम केवळ जिल्हा मुख्यालयी अत्यंत साधेपनाने करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.

पालकमंत्र्यांनी केली स्त्री रुग्णालयाची पाहणी : ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी यवतमाळ शहरात कोरोनाबाधित रुग्णांसाठी तयार होत असलेल्या स्त्री रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी बांधकामाची परिस्थती, बेड उपलब्धता, ऑक्सीजन बेड पॉईंटस, उपलब्ध वैद्यकीय स्टाफ आदींचा आढावा घेतला. दिवसरात्र एक करून येथील उर्वरीत कामे त्वरीत पूर्ण करावीत. जेणेकरून तीन-चार दिवसांत हे रुग्णालय कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी कार्यान्वित करण्यात येईल, अशा सुचना त्यांनी दिल्या. यावेळी जि. प. अध्यक्षा कालिंदा पवार, नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, व-हाडे, उपजिल्हाधिकारी सविता चौधर, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. डी. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी प वार, डॉ. सत्यपाल जैन, डॉ. रमा बाजोरिया, डॉ. संध्या राठोड, डॉ. रविशेखर पाटील आदी उपस्थित होते.     

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी