कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-या रुग्णांची संख्या जास्त

 Ø 981 जण पॉझेटिव्ह, 1116 कोरोनामुक्त, 24 मृत्यु

Ø जिल्ह्याबाहेरील एक मृत्यु व 18 बाधित

       यवतमाळ, दि. 1 : जिल्ह्यात गत 24 तासात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी जाणा-यांची संख्या जास्त आहे. शनिवारी जिल्ह्यात 981 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 1116 जण कोरोनामुक्त झाले. तसेच एकूण 24 मृत्यु झाले असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 22, डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये एक आणि खाजगी रुग्णालयात एक मृत्यु झाला. तसेच एकूण मृत्युपैकी एक मृत्यु नांदेड जिल्ह्यातील आहे.

जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार शनिवारी एकूण 6093 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 981 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5112 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6742 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2567 तर गृह विलगीकरणात 4175 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 53992 झाली आहे. 24 तासात 1116 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 45949 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1301 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.71असून मृत्युदर 2.41 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 40, 52, 64, 63 वर्षीय पुरुष आणि 31 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 66 वर्षीय पुरुष व 70 वर्षीय महिला, नेर येथील 65 वर्षीय महिला, तालुक्यातील 35 वर्षीय पुरुष व 50 वर्षीय महिला, पांढरकवडा येथील 56 वर्षीय पुरुष, बाभुळगाव येथील 48 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 68 वर्षीय पुरुष, वणी येथील 32 वर्षीय पुरुष व 35 वर्षीय महिला, तालुक्यातील 50 वर्षीय पुरुष व 70 वर्षीय महिला, मारेगाव येथील 70 वर्षीय पुरुष, दिग्रस तालुक्यातील 40 वर्षीय पुरुष, आर्णि येथील 65 वर्षीय महिला, कळंब तालुक्यातील 78 वर्षीय पुरुष आणि माहूर (जि. नांदेड) येथील 65 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर मध्ये पांढरकवडा तालुक्यातील 65 वर्षीय पुरुषाचा तर खाजगी रुग्णालयात 65 वर्षीय महिलेचा मृत्यु झाला.

            शनिवारी पॉझेटिव्ह आलेल्या 981 जणांमध्ये 627 पुरुष आणि 354 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 206 पॉझेटिव्ह रुग्ण, वणी 123, पुसद 112, पांढरकवडा 102, घाटंजी 82, दारव्हा 63, आर्णि 61, बाभुळगाव 48, झरी 45, नेर 31, दिग्रस 25, राळेगाव 22, मारेगाव 19, कळंब 12, उमरखेड 7, महागाव 5, आणि इतर शहरातील 18 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 424900 नमुने पाठविले असून यापैकी 417406 प्राप्त तर 7494 अप्राप्त आहेत. तसेच 363414 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी