जिल्हाधिका-यांची सावरगड, रामपूर, पारवा, शिबला येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

 




Ø  लसीकरणाची पाहणी व यंत्रणेचा आढावा

यवतमाळ, दि. 18 : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसंदर्भात तालुका प्रशासनाने केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सावरगड, रामपूर, पारवा आणि झरीजामणी तालुक्यातील शिबला येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व जांब येथील आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केली. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पांढरकवडा येथील आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते.

सर्वप्रथम जिल्हाधिका-यांनी सावरगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली.  यानंतर घाटंजी तालुक्यातील रामपूर व पारवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन कोरोनाबाधित रुग्ण व लसीकरण बाबत पाहणी केली. तसेच जांब येथील आश्रम शाळेला भेट देऊन कोव्हीड केअर सेंटरबाबत नियोजन करण्याच्या सुचना दिल्या. पांढरकवडा येथे तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी म्हणाले, आपापल्या कार्यक्षेत्रातील ग्रामस्तरीय समित्या सक्रीय करा. मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी पॉझेटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा त्वरीत शोध घेऊन त्यांची तपासणी करा. कोव्हीड संदर्भात शासन आणि प्रशासनाने दिलेल्या निर्बंधाची कडक अंमलबजावणी करा. तालुक्यात लसीकरणाची गती वाढवा. 45 वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोज प्राधान्याने देण्यावर भर द्यावा, आदी सुचना त्यांनी दिल्या.

यावेळी घाटंजीचे तहसीलदार पूजा मातोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. धर्मेश चव्हाण, पांढरकवडा येथील तहसीलदार सुरेश कवडे, गटविकास अधिकारी सुरेश चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी संजय मडावी ,  वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय पुराम, डॉ. अश्विनी भोयर, डॉ. सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

०००००००

 


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी