18 ते 44 वयोगटातील 910 जणांना लस

 


Ø जिल्ह्यात लसीकरणासाठी पाच केंद्र

       यवतमाळ, दि. 2 : महाराष्ट्र दिनापासून जिल्ह्यात 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यासाठी जिल्ह्यात एकूण पाच केंद्र आहे. यात यवतमाळ शहरात पाटीपूरा आणि लोहारा येथे तर उर्वरीत तीन दारव्हा, पुसद आणि पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयाचा समावेश आहे. जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील  910 जणांना लस देण्यात आली असून सर्वाधिक 190 जणांचे लसीकरण पाटीपुरा येथील केंद्रावर करण्यात आले. यानंतर पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात 187 जण, यवतमाळ शहरातील लोहारा येथील केंद्रावर 185 जण, दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात 181 जण आणि पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात 167 जणांनी लस घेतली.

            लसीकरणासाठी नोंदणी करण्याची पध्दत : 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वप्रथम selfregistration.cowin.gov.in किंवा CoWIN Application किंवा Arogya Setu Application ॲपवर / पोर्टलवर नोंदणी करावी. यानंतर फोटो ओळखपत्राचा उल्लेख करावा. (फोटो ओळखपत्रामध्ये आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड, पॅन कार्ड आदींचा समावेश). यानंतर लसीकरण केंद्र निवडावे व निवड केलेल्या केंद्रावरच दिलेल्या ठराविक वेळेत प्रत्यक्ष उपस्थित राहून रांगेत नंबर लावावा व आपल्या क्रमांकानुसार लस घ्यावी. लसीकरण झाल्यानंतर आपल्या मोबाईलवर संदेश प्राप्त होईल. दुस-या डोजसाठी कालावधी पूर्ण झाल्यानंतर अशीच प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

००००००

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी