जिल्ह्यात टेस्टिंगचे प्रमाण वाढले ; निगेटिव्ह रिपोर्टमध्येही वाढ

 


Ø 24 तासात 7792 जण निगेटिव्ह

Ø 1317 जण पॉझेटिव्ह, 1204 कोरोनामुक्त, मृत्यु 19

       यवतमाळ, दि. 4 : कोरोनाविरुध्दच्या लढाईत ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट ही त्रृसुत्री अतिशय महत्वाची आहे. लवकर निदान झाले आणि त्यावर त्वरीत उपचार मिळाले तर आपला कोरोनापासून बचाव होऊ शकतो, याचे महत्व जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना समजले आहे. त्यामुळे लोक स्वत:हून टेस्टिंगसाठी समोर येत आहे. परिणामी जिल्ह्यात टेस्टिंगच्या प्रमाणात वाढ झाली असून निगेटिव्ह रिपोर्टचा आकडाही वाढत आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 7792 जणांचे निगेटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाले आहे.

            कोरोनाच्या सुरवातीच्या काळात नागरिकांमध्ये टेस्टिंग करण्याबाबत मोठ्या प्रमाणात भीती होती. त्यामुळे लक्षणे असली तरी नागरिक चाचणी करण्यास नकार देत होते. आता मात्र नागरिकांमध्ये जागरुकता वाढली आहे. त्यामुळे लोक स्वत:हून टेस्टिंग करीत आहे. नागरिकांचा असाच प्रतिसाद राहिला तर कोरोनावर नक्कीच मात करता येईल. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.  

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 9109 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1317 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 7792 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. तसेच गत 24 तासात जिल्ह्यात 1204 जण कोरोनामुक्त झाले असून एकूण 19 मृत्यु झाले. यात इतर जिल्ह्यातील दोन मृत्युंचा समावेश आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 15 मृत्यु, डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये दोन आणि खाजगी रुग्णालयात दोन मृत्यु झाले आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात 6795 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2515 तर गृह विलगीकरणात 4280 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 57476 झाली आहे. 24 तासात 1204 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 49308 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1373 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.99 असून मृत्युदर 2.39 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 38, 44 वर्षीय पुरुष, यवतमाळ तालुक्यातील 44, 80 वर्षीय पुरुष व 78 वर्षीय महिला, वणी येथील 70 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 30 वर्षीय महिला, दिग्रस तालुक्यातील 22 वर्षीय महिला, घाटंजी तालुक्यातील 76 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 50 वर्षीय पुरुष, बाभुळगाव येथील 75 वर्षीय पुरुष, झरी तालुक्यातील 37, 38 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 40 वर्षीय पुरुष आणि मारेगाव येथील 42 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये मृत झालेल्यामध्ये उमरखेड तालुक्यातील 75 वर्षीय महिला, पांढरकवडा तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष आहे. तर खाजगी रुग्णालयात किनवट (जि. नांदेड) येथील 55 वर्षीय पुरुष आणि चंद्रपूर येथील 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला.

            मंगळवारी पॉझेटिव्ह आलेल्या 1317 जणांमध्ये 788 पुरुष आणि 529 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 260 पॉझेटिव्ह रुग्ण, पांढरकवडा 189, वणी 157, पुसद 86, घाटंजी 83, आर्णि 82, दारव्हा 80,   दिग्रस 75, झरीजामणी  65, बाभुळगाव 47,  मारेगाव 40, उमरखेड 38, नेर 37, कळंब 25, महागाव 24, राळेगाव 22 आणि इतर शहरातील 7 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 442601 नमुने पाठविले असून यापैकी 438339 प्राप्त तर 4262 अप्राप्त आहेत. तसेच 380803 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी