आरोग्य विभागाच्या फेक पदभरती जाहिरातीबाबत तक्रार दाखल

 


Ø बेरोजगार उमेदवारांनी बळी न पडण्याचे आवाहन

            यवतमाळ, दि. 17 : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्या नावाने पदभरतीबाबत सोशल मिडीयावर फिरत असलेल्या फेक जाहिरातीसंदर्भात यवतमाळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

            सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रिक्त पदाच्या सरळ सेवा पध्दतीने पदभरतीबाबत 16 मे पासून सोशल मिडीयावर फेक जाहिरात प्रसारीत होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र अशा कोणत्याही प्रकारची जाहिरात जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत प्रसिध्द करण्यात आली नसून फेक जाहिरातीत असलेले रिक्त पदे सरळसेवा पध्दतीने भरण्याची कोणत्याही प्रकारची पदभरती प्रक्रिया जिल्हा आरोग्य कार्यालयामार्फत सुरू नाही, असे कळविण्यात आले आहे.

            सोशल मिडीयावर प्रसारीत होणारी जाहिरात ही पूर्णपणे खोटी असून बेरोजगार उमेदवारांची दिशाभुल करणारी आहे. तसेच भविष्यात अनुचित प्रकारास वाव देणारी असल्यामुळे नागरिकांनी या फेक जाहिरातीला बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने केले आहे.

 

अशा प्रकारची आहे फेक जाहिरात : नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात अर्धवेळ एमबीबीएस (1 पद), स्टाफ नर्स  (6 पदे), आरोग्य सेवक (26 पदे), ए.एन.एम (7 पदे), औषध निर्माता (5 पदे) आणि लॅब टेक्निशियन  (6 पद) या पदासाठी 10 ते 25 मे 2021 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. सदर फेक जाहिरातीमध्ये पदानुसार शैक्षणिक अर्हता नमुद केली असून मासिक वेतनाचासुध्दा उल्लेख आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी