Posts

Showing posts from April, 2021

जिल्ह्यात 1161 नव्याने पॉझेटिव्ह, 1057 कोरोनामुक्त

  Ø इतर जिल्ह्यातील दोन मृत्युसह एकूण 34 मृत्यू        यवतमाळ, दि. 30 : गत 24 तासात जिल्ह्यात 1161 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून 1057 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 34 मृत्यु झाले. यातील 18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, सात मृत्यु डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये तर नऊ मृत्यु खाजगी रुग्णालयात झाले. जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 6545 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1161 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5384 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6901 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2539 तर गृह विलगीकरणात 4362 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 53011 झाली आहे. 24 तासात 1057 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 44833 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1277 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.67 असून मृत्युदर 2.41 आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 90 वर्षीय

ब्रेक दि चेन अंतर्गत 15 मे पर्यंत निर्बंध कायम

          यवतमाळ, दि. 30 : ब्रेक दि चेन अंतर्गत जिल्ह्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. तसेच सदर कालावधीत राज्यात कलम 144 (संचारबंदी) लागू करण्यात आली आहे. मुख्य सचिव यांच्या आदेशान्वये 1 मे च्या सकाळी 7 वाजेपासून ते 15 मे 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत ब्रेक दि चेन अंतर्गत घालून देण्यात आलेले निर्बंध कायम करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 यातील मार्गदर्शक सूचनेनुसार यवतमाळ जिल्ह्याकरीता 15 मे 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत ब्रेक दि चेन अंतर्गत घालून देण्यात आलेले निर्बंध कायम केले आहे. तसेच सदर कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयाचे 14 एप्रिल, 20 एप्रिल व 22 एप्रिल 2021 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना दिनांक 15 मे 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहतील.             सदर आदेश यवतमाळ शहर व जिल्ह्याकरीता शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील. जे वरील आदेशांचे उल्लंघन करतील त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 18

जलजीवन मिशनच्या 527 कोटींच्या आराखड्याला पालकमंत्र्यांनी दिली मंजूरी

Image
  Ø जिल्हा टँकरमुक्त करण्याचे निर्देश        यवतमाळ, दि. 30 : जलजीवन मिशन अंतर्गत मार्च 2024   पर्यंत देशातील प्रत्येक गाव, वाडी-वस्तीत वैयक्तिक नळ जोडणीद्वारे पाणी देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ग्रामीण भागात प्रतिदिवस प्रतिमाणशी 40 लिटर ऐवजी 55 लीटर गुणवत्तापूर्वक पाणी देण्याचे उद्दिष्ट आहे. याअंतर्गत जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी जलजीवन मिशनच्या 527.80 कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजूरी दिली.             जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय जलजीवन मिशन समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी यावेळी जि.प. अध्यक्षा कालिंदा पवार, खासदार सर्वश्री, बाळू धानोरकर, भावना गवळी, आमदार सर्वश्री इंद्रनील नाईक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कोल्हे आदी उपस्थित होते.               जलजीवन मिशनच्या 527.80 कोटीच्या आराखड्यामध्ये प्रपत्र अ नुसार 687 गावांसाठी 49.67 कोटी रुपये, प्रपत्र ब नुसार 311 गावांसाठी 309.01 कोटी, प्रपत्र क नुसार 543 गावांसाठी 120.52 कोटी

बोगस बियाणांची वाहतूक व पुरवठ्याला आळा घाला – पालकमंत्री भुमरे

Image
  Ø जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक        यवतमाळ, दि. 30 : शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला असून कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी त्याची लगबग सुरू आहे. जिल्ह्यात उत्कृष्ट प्रतीचे बियाणे, खते, किटकनाशक आदींचा पुरवठा शेतक-यांना होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात चोरट्या मार्गाने बोगस बियाणे येत असल्यास त्याच्या वाहतूकीवर तसेच पुरवठ्यावर आळा घालून संबंधितांवर कडक कारवाई करा, असे निर्देश रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी कृषी विभागाला दिले.             जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जि.प. अध्यक्षा कालिंदा पवार, खासदार सर्वश्री, बाळू धानोरकर, भावना गवळी, आमदार सर्वश्री इंद्रनील नाईक, डॉ. अशोक उईके, डॉ. संदीप धुर्वे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते. खरीप हंगाम हा शेतक-यांच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. भुमरे म्हणाले, या हंगामाच्या भरोशावरच त्याचा संप

पालकमंत्र्यांनी केली डीसीएचसी ची पाहणी

Image
  Ø वणी, पांढरकवडा, मारेगाव येथे भेट        यवतमाळ, दि. 29 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच शासकीय रुग्णालयात वैद्यकीय सुविधांची पाहणी करण्याकरीता राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी वणी, पांढरकवडा आणि मारेगाव येथे भेट दिली.             वणी येथील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ नुकतेच सुरू करण्यात आले असून येथील सोयीसुविधा, उपलब्ध वैद्यकीय स्टाफ आदींबाबत त्यांनी विचारणा केली. तसेच प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे 16 नवीन रुग्णवाहिका घेण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. वणी ते यवतमाळ हे अंतर फार लांब आहे. एखाद्या गंभीर रुग्णाला यवतमाळ येथे स्थलांतरीत करावयाचे असल्यास रुग्णवाहिका येईपर्यंत संबंधित रुग्णाला ऑक्सीजनची पुर्तता करावी, अशा सुचना त्यांनी दिल्या.             जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी दर व मृत्युंची संख्या कमी करण्यासाठी गांभिर्याने सर्व्हे करून रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा त्वरीत शोध घेणे, त्यांची चाचणी करणे, चाचणी अहवाल पॉझेटिव्ह आल्यास संबंधितांना कोव्हीड क

कृषी निविष्ठाचा काळाबाजार करणा-यांवर कडक कारवाई करा

Image
  Ø जिल्हाधिका-यांचे कृषी विभागाला निर्देश        यवतमाळ, दि. 29 : शेतक-यांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्याला आवश्यक असलेले बियाणे, खते, किटकनाशक आदींचे सुक्ष्म नियोजन कृषी विभागाने करावे. तसेच कृषी निविष्ठांचा काळाबाजार होणार नाही, याबाबत दक्ष राहून काळाबाजार करणा-यांवर कडक कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले.             जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम 2021 मध्ये कृषी निविष्ठांच्या नियोजनासाठी जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर पोलिस अधिक्षक खांडेराव धरणे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जि.प.कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे आदी उपस्थित होते. आढावा बैठकीमध्ये आवश्यक बियाणे व खते, याबाबत महिनानिहाय नियोजनाबाबत चर्चा झाली. तसेच शेतकऱ्यांना अप्रमाणित कृषी निविष्ठांचा पुरवठा होणार नाही, याबाबत दक्ष राहावे. तसेच कृषी निविष्ठांची परिणामकारक गुणवत्ता तपासणी होण्यासाठी आणि खरीप हंगामात कृ

बाधितांपेक्षा कोरानामुक्त रुग्णांची संख्या 249 ने जास्त

  Ø जिल्ह्यात 855 नव्याने पॉझेटिव्ह, 1104 कोरोनामुक्त, 31 मृत्यू        यवतमाळ, दि. 29 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. लगातार दोन दिवस (28 व 29 एप्रिल) कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनातून बरे होणा-यांचा आकडा जास्त आहे. ही नक्कीच जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. गुरुवारी तर कोरोनामुक्त होणा-यांची संख्या बाधितांपेक्षा तब्बल 249 ने जास्त होती. गत 24 तासात जिल्ह्यात 855 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून 1104 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 31 मृत्यु झाले. यातील 21 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, चार मृत्यु डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये तर सहा मृत्यु खाजगी रुग्णालयात झाले. जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 5546 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 855 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4691 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6831 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2524 तर गृह विलगीकरणात 4307 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत

पालकमंत्री यांचा 29 व 30 एप्रिल रोजीचा यवतमाळ जिल्हा दौरा

Image
          यवतमाळ, दि. 28 : राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे हे यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.             गुरुवार दिनांक 29 एप्रिल 2021 रोजी दुपारी 3.15 वाजता नागपूर विमानतळ येथून करंजी ता. पांढरकवडाकडे प्रयाण. सायंकाळी 4.45 ते 5 वाजता करंजी येथील ग्रामीण रुग्णालयास भेट व पाहणी. पांढरकवडाकडे प्रयाण. सायंकाळी 5.20 ते 5.35 वाजता पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालय भेट व पाहणी, मारेगावकडे प्रयाण, सायंकाळी 6.10 ते 6.25 वाजता मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालय भेट व पाहणी. वणीकडे प्रयाण. सायंकाळी 6.50 ते 7.15 वाजता वणी येथील ग्रामीण रुग्णालय भेट व पाहणी. यवतमाळकडे प्रयाण. रात्री 21.15 वाजता शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे आगमन, राखीव व मुक्काम.             शुक्रवार दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी सकाळी 9.20 वाजता शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथून स्त्री रुग्णालयकडे प्रयाण. सकाळी 9.30 ते 10 वाजता स्त्री रुग्णालय भेट व पाहणी. जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळकडे प्रयाण. सकाळी 10 ते 11 वाजता खरीप हंगाम पूर्व तयारी आढावा ब

बालविवाह थांबविण्यात जिल्हा बाल संरक्षण कक्षाला यश

  यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यात एप्रिल महिन्यात यापुर्वीच जवळपास दहा बालविवाह थांबविण्यात बाल संरक्षण कक्षाला यश आले आहे. पुन्हा एकदा बाल संरक्षण कक्षाच्या सतर्कतेमुळे एक बालविवाह थांबविण्यात आला आहे. कळंब तालुक्यातील खैरी येथे मामाकडे वास्तव्याला असलेल्या व मुळच्या सावंगी (पोड) जिल्हा वर्धा येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा गोदणी जिल्हा यवतमाळ येथील व्यक्तीसोबत 29 एप्रिल 2021 रोजी विवाह होणार होता. याबाबत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, वर्धा यांच्यामार्फत जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयास लेखी माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांनी खैरी गावातील पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती यांच्या मदतीने मुलीच्या नातेवाईकांनी भेट घेऊन मुलीचे लग्न सज्ञान झाल्यानंतर करण्याबाबत समुपदेशन केले. तसेच बालविवाहाचे शारीरिक, मानसिक दुष्परिणाम समजावून सांगितले. मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21   पेक्षा कमी असेल तर असा विवाह करणे हा बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अन्वये दखल पात्र गुन्हा आहे. याबाबत माहिती देण्यात आली. मुलीच्या नातेवाईकांनी

863 जण नव्याने पॉझेटिव्ह ; 880 कोरोनामुक्त

  Ø 30 मृत्यु        यवतमाळ, दि. 28 : जिल्ह्यात गत 24 तासात 863 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून 880 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 30 मृत्यु झाले. यातील 24 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, दोन मृत्यु डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये तर चार मृत्यु खाजगी रुग्णालयात झाले. जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 5401 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 863 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4538 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 7111 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2623 तर गृह विलगीकरणात 4488 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 50995 झाली आहे. 24 तासात 880 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 42672 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1212 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.58 असून मृत्युदर 2.38 आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 60,57, 54, 63,   वर्षीय पुरुष व 51, 70, 68 वर्षीय

जिल्ह्यात 284 लसीकरण केंद्राचे नियोजन

Image
  Ø यवतमाळ शहरातील पाटीपूरा केंद्रावर सर्वाधिक लसीकरण        यवतमाळ, दि. 27 : कोरोनाविरुध्दच्या लढाईत कोव्हीड प्रतिबंधात्मक लस हे एक प्रभावी शस्त्र ठरत आहे. शासनाने लसीकरणाला प्राधान्य दिले असून आपापल्या जिल्ह्यात जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्ह्यात लसीकरणाचे नियोजन करण्यात आले असून संपूर्ण जिल्ह्यात 284 केंद्र कार्यरत करण्यात येणार आहे.             16 जानेवारी 2021 पासून जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात झाली. सुरवातीच्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी तसेच फ्रंटलाईन वर्कर (यात महसूल, पोलिस, जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत राज व्यवस्थेतील कर्मचारी) यांनाच लस देण्यात आली. आता मात्र 45 वर्षांवरील सर्व पात्र नागरिकांना लस देण्यात येत आहे. तसेच 1 मे 2021 पासून 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या वयोगटातील जवळपास 21 लक्ष लोकसंख्येला लस देण्याचे जिल्ह्यात उद्दिष्ट आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 130 लसीकरण केंद्रावर लस देण्याचे काम सुरू आहे. यात 112 शासकीय केंद्र तर 18

जिल्ह्यात एक हजार जण पॉझेटिव्ह ; 520 कोरोनामुक्त

  Ø वर्धा   येथील एका मृत्युसह एकूण 25 मृत्यु        यवतमाळ, दि. 27 : जिल्ह्यात गत 24 तासात 1000 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून 520 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 25 मृत्यु झाले. यातील 20 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, एक मृत्यु डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये तर चार मृत्यु खाजगी रुग्णालयात झाले. एक मृत्यु जिल्ह्याबाहेरील म्हणजे वर्धा येथील आहे. जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 5608 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1000 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4608 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 7158 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2690 तर गृह विलगीकरणात 4468 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 50132 झाली आहे. 24 तासात 520 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 41792 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1182 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.54 असून मृत्युदर 2.36 आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृ

अतिरिक्त बील आकारल्याप्रकरणी सहा कोव्हीड रुग्णालयांना नोटीस

  Ø 48 तासात उत्तर सादर करण्याचे निर्देश        यवतमाळ, दि. 27 : जिल्ह्यातील खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये भरती असलेल्या रुग्णांकडून मनमानी बील घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने या रुग्णालयात ऑडीटर नियुक्त केले आहे. या ऑडीटरांनी बिलांच्या तपासण्या करून जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर केला. त्यानुसार यवतमाळ शहरातील सहा खाजगी कोव्हीड रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली आहे.             जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरीता शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यामध्ये 24 खाजगी रुग्णालयांना डेडीकेटेड कोव्हीड केअर सेंटर म्हणून मान्यता देण्यात आली. कोरोनाबाधित रुग्णांकडून कोणत्याही प्रकारचे जादा शुल्क आकारणी होऊ नये, याकरीता निवासी उपजिल्हाधिकारी   ललितकुमार व-हाडे यांची सनियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. रुग्णालयात नियुक्त केलेल्या ऑडीटर यांनी बिलाच्या तपासण्या करून जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर केला. त्यानुसार अतिरिक्त बील आकारल्याप्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे या

जिल्ह्यातील विविध कोव्हीड रुग्णालयात 1496 बेड उपलब्ध

  Ø आयसीयु 14, ऑक्सीजन 138 तर नॉर्मल बेड 1344 शिल्लक Ø जिल्हा प्रशासनाच्यावतीने 280 बेडचे अतिरिक्त नियोजन        यवतमाळ, दि. 26 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचाराला जिल्हा प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून बरे होण्याचे प्रमाणसुध्दा वाढत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चार डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर (डीसीएचसी), 24 खाजगी कोव्हीड हॉस्पीटल आणि 33 कोव्हीड केअर सेंटरमार्फत रुग्णांवर उपचार सुरू आहे. बेडच्या उपलब्धतेबाबत जिल्हा प्रशासन दक्ष असून अद्यापही जिल्ह्यातील विविध कोव्हीड रुग्णालयात 1496 बेड उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे पालकमंत्री संदिपान भुमरे आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अतिरिक्त 280 बेडचे नियोजन केले आहे.             शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा ताण कमी करणे आणि जिल्ह्यातील सर्व भागात उपचाराची सुविधा निर्माण करणे या उद्देशाने जिल्ह्यात एकूण 33 कोव्हीड केअर सेंटर, तसेच पुसद, पांढरकवडा, दारव्हा आणि यवतमाळ येथे आयुर्वेदिक कॉलेज असे एकूण चार डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर, 24 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलच्या माध्यमातून रुग्णां