26 मृत्युसह जिल्ह्यात 1237 नव्याने पॉझेटिव्ह


Ø 660 जण कोरोनामुक्त

          यवतमाळ, दि. 16 : गत 24 तासात जिल्ह्यात एकूण 26 मृत्यु झाले असून यातील 22 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर चार मृत्यु खाजगी रुग्णालयात झाले आहे. मृतांपैकी चार जण यवतमाळ जिल्ह्याबाहेरील आहे. शुक्रवारी 1237 जण  नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 660 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

            जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या मृतांमध्ये यवतमाळ येथील 36, 55, 47, 82, 51, 69 वर्षीय पुरुष व 47 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष व 68 वर्षीय महिला, मारेगाव तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 47 वर्षीय महिला व 61 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 80 वर्षीय पुरुष व दिग्रस तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष, आर्णि येथील 68 वर्षीय पुरुष, कळंब येथील 75 वर्षीय महिला, वणी येथील 75 वर्षीय महिला, नेर तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष, नागपूर येथील 70 वर्षीय महिला, वरोरा येथील 65 वर्षीय पुरुष, धामणगाव येथील 55 वर्षीय पुरुष आणि मानोरा (जि.वाशिम) तालुक्यातील 26 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर खाजगी रुग्णालयात मृत्यु झालेल्यांमध्ये पुसद येथील 45 व 65 वर्षीय महिला, यवतमाळ येथील 59 वर्षीय महिला आणि देवळी (जि.वर्धा) तालुक्यातील 80 वर्षीय पुरुष आहे.

शुक्रवारी पॉझेटिव्ह आलेल्या 1237 जणांमध्ये 727 पुरुष आणि 510 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 431 पॉझेटिव्ह रुग्ण, पुसद 107, पांढरकवडा 105, उमरखेड 98, कळंब 90, वणी 77, दिग्रस 69, मारेगाव 45, घाटंजी 41, आर्णि 31, बाभुळगाव 30, नेर 30, महागाव 22, झरीजामणी 20, दारव्हा 18, राळेगाव 9 आणि इतर शहरातील 14 रुग्ण आहे.

            शुक्रवारी एकूण 4929 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1237 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3692 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4987 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2430 तर गृह विलगीकरणात 2557 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 38524 झाली आहे. 24 तासात 660 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 32694 आहे. तर जिल्ह्यात एकूण 843 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.60 असून मृत्युदर 2.19 आहे.

            सुरवातीपासून आतापर्यंत 332184 नमुने पाठविले असून यापैकी 329833 प्राप्त तर 2351 अप्राप्त आहेत. तसेच 291309 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

जिल्ह्यातील रुग्णालयात असलेल्या बेडची उपलब्धता : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 577 बेडपैकी 558 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 19 बेड शिल्लक आहेत. दारव्हा येथील डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये 50 पैकी 14 बेड शिल्लक, पुसद येथील डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये 50 पैकी 37 बेड शिल्लक आणि पांढरकवडा येथील डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये 60 पैकी 20 बेड शिल्लक आहेत. तर जिल्ह्यातील 19 खाजगी कोव्हीड रुग्णालयांमध्ये 470 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 239 बेड शिल्लक आहेत.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी