जिल्हाधिका-यांचा एकाच दिवशी पाच तालुक्यांचा दौरा





Ø कोव्हीड केअर सेंटरला भेट व पाहणी, अधिका-यांना सुचना

       यवतमाळ, दि. 25 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणणे व मृत्युदर कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी एकाच दिवशी पाच तालुक्यांचा दौरा करून अधिका-यांना सुचना केल्या. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ उपस्थित होते.

            जिल्ह्यातील कळंब, राळेगाव, वणी, पांढरकवडा आणि घाटंजी येथे जिल्हाधिका-यांनी कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटर, ग्रामीण रुग्णालय आदींना भेटी देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पाहणी केली. तसेच पॉझेटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन चाचणी करणे, चाचण्यांचे प्रमाण वाढविणे, मृत्युदर शुन्यावर आणण्यासाठी गांभिर्याने नियोजन करणे, लक्षणे आढळताच संबंधितांना कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल करणे, तसेच गृहविलगीकरणात असलेल्यांवर नियमितपणे लक्ष ठेवणे, गृहविलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई करणे, संचारबंदीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आदी सुचना त्यांनी अधिका-यांना दिल्या. तसेच आपापल्या तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र नागरिकांचे लसीकरण त्वरीत करून घेण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करा. 1 मे पासून 18 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरूवात होणार आहे, त्यादृष्टीने आतापासून नियोजन करा, अशाही सुचना त्यांनी दिल्या.

            वणी येथील बैठकीला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. पुजलवार, तहसीलदार श्री. पांडे यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते. तर केळापूर येथील बैठकीला सहाय्यक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, तहसीलदार सुरेश कव्हळे, तालुका आरोग्य अधिकारी संजय मडावी, वैद्यकीय अधिकारी वैशाली सातूरवर, न.प.मुख्याधिकारी राजू मोत्तेमवार, कळंब येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय आकोलकर आदी उपस्थित होते.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी