जिल्हाधिका-यांनी घेतला मान्सूनपूर्व कामांचा आढावा

 



यवतमाळ, दि. 6 : जिल्ह्यात आगामी काळात येणा-या मान्सूनपूर्व कामांचा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक अमर गजभिये, बेंबळा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्री. सनेकार, यवतमाळ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. खंदारे, अरुणावती प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता केतन आकूलकर, यवतमाळ पाटबंधारे विभागाचे उपअधिक्षक जी. एल. राठोड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतिश मून आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील पूर प्रवण गावांची ओळख करणे, मुख्य नदयांच्या प्रवाहामधील अडथळे काढणे, नैसर्गिक जलाशयांचे साफसफाई करणे व त्यातील गाळ काढणे तसेच सरळीकरण करण्यात यावे. नदीकाठावरील बंधा-यांची / साठवण तलावाची  पाहणी करणे आणि गरज असल्यास त्यांचे बळकटीकरण करणे, डागडूजी करणे इ. कामे पाटबंधारे व सिंचन मंडळाने करून घ्यावी. तसेच सर्व प्रमुख धरणावर नोडल अधिका-यांची नेमणूक करून त्याची माहिती सर्व नियंत्रण कक्षास उपलब्‍ध करुन द्यावी. धरणाच्या आजूबाजूला राहणा-या गावक-यांना, धरणातून होणा-या पाण्याच्या विसर्गाबद्दल सावधगिरीचा इशारा देण्‍यात यावा. धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी कमीतकमी 5 ते 6 तास अगोदर सूचना द्यावी. पाणी सोडण्याबाबत संबंधित विभागातील अधिका-यांशी समन्वय ठेवावा.

सर्व तहसीलदार व न.प. मुख्याधिका-र्व तहसीलदार व न.प. मुख्याध्‍िूयांनी नदी व नाल्‍याकाठची अतिक्रमण हटविणे, पावसाच्या पाण्याच्या निचरासाठी सुव्यवस्था करणे, नगर परिषद क्षेत्रातील नाली सफाई करणे, धोकादायक इमारतीची ओळख करुन संबधितांना इमारत रिकामे करण्‍याबाबत नोटिस द्यावी. तसेच शोध बचाव साहित्‍य सुस्थितीत असल्‍याची खात्री करून तसा अहवाल जिल्‍हाधिकारी कार्यालयास सादर करावा. आपात्कालीन परिस्थितीत परिवहन साधनांची व्यवस्था करणे, राहण्याची योग्य व्यवस्था, शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था, खाद्यपदार्थ  व औषधांचा पुरेसा साठा ठेवावा. नियंत्रण कक्षाचे कामकाज 24 तास चालू ठेवावे. आपत्ती विषयक पूर्वसूचनांचे नियोजन करणे, आदी कामेसुध्दा प्राधान्याने करावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

तालुका स्तरावरील नागरी सुरक्षा दल, गृह रक्षक दल, अशासकीय  संस्था इ. यांचे समवेत समन्वयन बैठकीचे व प्रशिक्षणाचे आयोजन करणे, पूरप्रवण गावांचे संबंधित सरपंच, तलाठी, ग्रामसेवक व इतर शासकीय  कर्मचारी यांच्या समवेत तहसीलदार यांनी बैठक आयोजित करणे. अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवणे, विद्युत पुरवठा, दुरध्वनी, रस्ते व पुल इ. आपत्तीच्या वेळीसुध्दा सुरळीत सुरु राहतील, या हेतूने पूर्व तयारी करणे. पूर परिस्थितीत व पूर परिस्थिती ओसरल्यानंतर लागणारे औषधीद्गव्यांचे पूर्व नियोजन करावे. प्राथमिक आरोग्य केंद्गासाठी लागणा-या औषधांचा साठा सुनिश्चित करणेजिल्हयामध्ये असलेले वैद्यकीय अधिकारी व निमवैद्यकीय अधिकारी यांचे डाटा बेस तयार ठेवणे.

जिल्हयांमध्ये स्वच्छता व आरोग्यदायी परिसर टिकवून ठेवण्यासाठी सर्व उपाययोजना करणे. साथीचा आजार/ रोगांवर नियंत्रण व उपाययोजनेचा आराखडा तयार ठेवणे. जिल्हा व तालुकास्तरावर कार्यरत असलेल्या विभागनिहाय नोडल अधिका-यांचे नाव व संपर्क, दूरध्वनी क्रमांकाची यादी तयार करुन सर्व  संबंधितांना उपलब्ध करुन देण्यात यावी.

मदत कार्यामधील पारदर्शकता ठेवण्यासाठी आपादग्रस्तांची व लाभार्थ्यांची यादी अचूक तयार करावी. अशी यादी ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय व स्थानिक संस्थांचे नोटीस बोर्डवर लावण्यात यावी. तालुका स्तरावरील नियंत्रण कक्ष 24 तास सुरु राहील, याची दक्षता घ्यावी. अतिवृष्टी, पुरामुळे संपर्क तुटणा-या गावातील तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलिस पाटिल, कृषी सेवक आदींचे संपर्क जिल्‍हा नियंत्रण कक्षात उपलब्‍ध करुन देण्‍यात यावे तसेच तालुका नियंत्रण कक्षात व गावातील दर्शनी भागात प्रसिध्‍द करावे, अशाही सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

यावेळी सर्व सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा कृषी अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभिंयंता यांचे प्रतिनिधी उपस्थीत होते.

०००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी