जिल्ह्यात एक हजार जण पॉझेटिव्ह ; 520 कोरोनामुक्त

 


Ø वर्धा  येथील एका मृत्युसह एकूण 25 मृत्यु

       यवतमाळ, दि. 27 : जिल्ह्यात गत 24 तासात 1000 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून 520 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 25 मृत्यु झाले. यातील 20 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, एक मृत्यु डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये तर चार मृत्यु खाजगी रुग्णालयात झाले. एक मृत्यु जिल्ह्याबाहेरील म्हणजे वर्धा येथील आहे.

जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 5608 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1000 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4608 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 7158 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2690 तर गृह विलगीकरणात 4468 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 50132 झाली आहे. 24 तासात 520 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 41792 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1182 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.54 असून मृत्युदर 2.36 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 64, 65, 72, 75 वर्षीय पुरुष, यवतमाळ तालुक्यातील 53  वर्षीय पुरुष, नेर येथील 77 वर्षीय पुरुष, महागाव तालुक्यातील 40 व 60 वर्षीय पुरुष, केळापूर येथील 45 वर्षीय पुरुष व 49 वर्षीय महिला, कळंब येथील 60 व 75 वर्षीय पुरुष, कळंब तालुक्यातील 77 वर्षीय पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 78 वर्षीय पुरुष, आर्णि तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष, आर्णि येथील 50 वर्षीय पुरुष, वणी तालुक्यातील 67 वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील 70 वर्षीय महिला आणि वर्धा येथील 64 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर मध्ये पुसद येथील 69 वर्षीय पुरुष तर खाजगी रुग्णालयात मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 52 व 66 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 73 वर्षीय पुरुष, वणी येथील 42 वर्षीय पुरुष आहे.

            मंगळवारी पॉझेटिव्ह आलेल्या 1000 जणांमध्ये 593 पुरुष आणि 407 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 301 पॉझेटिव्ह रुग्ण, मारेगाव 110, घाटंजी 106, पांढरकवडा 80, दिग्रस 70, पुसद 66, वणी 53, नेर 49, बाभुळगाव 42, आर्णि 33, झरी 30, कळंब 22, महागाव 11, दारव्हा 10, उमरखेड 9, राळेगाव 2, आणि इतर शहरातील 6 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 399847 नमुने पाठविले असून यापैकी 393818 प्राप्त तर 6029 अप्राप्त आहेत. तसेच 343686 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

०००००००

 

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी