जिल्ह्यातील विविध कोव्हीड रुग्णालयात 1496 बेड उपलब्ध

 


Ø आयसीयु 14, ऑक्सीजन 138 तर नॉर्मल बेड 1344 शिल्लक

Ø जिल्हा प्रशासनाच्यावतीने 280 बेडचे अतिरिक्त नियोजन

       यवतमाळ, दि. 26 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचाराला जिल्हा प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून बरे होण्याचे प्रमाणसुध्दा वाढत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चार डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर (डीसीएचसी), 24 खाजगी कोव्हीड हॉस्पीटल आणि 33 कोव्हीड केअर सेंटरमार्फत रुग्णांवर उपचार सुरू आहे. बेडच्या उपलब्धतेबाबत जिल्हा प्रशासन दक्ष असून अद्यापही जिल्ह्यातील विविध कोव्हीड रुग्णालयात 1496 बेड उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे पालकमंत्री संदिपान भुमरे आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अतिरिक्त 280 बेडचे नियोजन केले आहे.

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा ताण कमी करणे आणि जिल्ह्यातील सर्व भागात उपचाराची सुविधा निर्माण करणे या उद्देशाने जिल्ह्यात एकूण 33 कोव्हीड केअर सेंटर, तसेच पुसद, पांढरकवडा, दारव्हा आणि यवतमाळ येथे आयुर्वेदिक कॉलेज असे एकूण चार डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर, 24 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करण्यात येते. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व 577 (आयसीयु बेड – 80, ऑक्सीजन बेड – 410 आणि नॉर्मल बेड - 87) बेड रुग्णांच्या उपयोगात आहे. तर जिल्ह्यातील 24 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 206 आयसीयु बेड असून यापैकी 192 बेडवर रुग्ण भरती आहेत. तर 14 आयसीयु बेड शिल्लक आहेत. यात वणी येथील लोहिया हॉस्पीटलमध्ये 3 आयसीयु बेड, दिग्रस येथील डॉ. संदीप दुधे हॉस्पीटल मध्ये 3, वणी येथील सुगम हॉस्पीटलमध्ये 2 आणि पुसद येथील आयकॉन हॉस्पीटल, वडते हॉस्पीटल, यवतमाळातील संजीवन हॉस्पीटल, धवणे हॉस्पीटल, तावडे हॉस्पीटल आणि उमरखेड येथील निर्विघ्न हॉस्पीटल व क्रीटीकेअर हॉस्पीटलमध्ये प्रत्येक एक याप्रकारे 14 बेडची उपलब्धता आहे.

            जिल्ह्यातील 24 खाजगी कोव्हीड हॉस्पीटल तसेच पुसद, दारव्हा आणि यवतमाळ येथील आयुर्वेदिक कॉलेज येथील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये एकूण 138 ऑक्सीजन बेड उपलब्ध आहेत. यात खाजगी रुग्णालयात 111 तर डीसीएचसी मध्ये 27 ऑक्सीजन बेडची उपलब्धता आहे. खाजगी रुग्णालयात शिल्लक असलेल्या ऑक्सीजन बेडमध्ये वणी येथील लोढा हॉस्पीटलमध्ये 44 बेड, दिग्रस येथील डॉ. संदीप दुधे हॉस्पीटलमध्ये 12, पुसद येथील आयकॉन हॉस्पीटलमध्ये 22, वणी येथील सुगम हॉस्पीटलमध्ये 19, यवतमाळातील क्रिटीकेअर हॉस्पीटलमध्ये 7, उमरखेड येथील निर्विघ्न हॉस्पीटल व क्रीटीकेअर हॉस्पीटलमध्ये 3, यवतमाळ येथील कोव्हीड केअर हॉस्पीटलमध्ये 2 आणि यवतमाळ येथील धवणे हॉस्पीटल व पुसद येथील चव्हाण हॉस्पीटलमध्ये प्रत्येकी 1 ऑक्सीजन बेड शिल्लक आहे. तसेच डीसीएचसी मध्ये शिल्लक असलेल्या 27 ऑक्सीजन बेडमध्ये पुसद येथे 13, दारव्हा येथे 10 आणि यवतमाळ येथील आयुर्वेदिक कॉलेजमध्ये 4 ऑक्सीजन बेड उपलब्ध आहेत.

            तर जिल्ह्यातील सर्व 33 सीसीसी (यवतमाळ येथे 10, आर्णि, झरी, दिग्रस, नेर, महागाव, कळंब, वणी, दारव्हा येथे प्रत्येकी 2 सीसीसी, उमरखेड, राळेगाव, घाटंजी, मारेगाव, बाभुळगाव, पुसद, पांढरकवडा येथे प्रत्येकी 1 सीसीसी), 24 खाजगी कोव्हीड हॉस्पीटल आणि 4 डीसीएचसीमध्ये एकूण 1344 नॉर्मल बेड उपलब्ध आहे. यात सीसीसीमध्ये 1232 बेड, खाजगी कोव्हीड रुग्णालयात 66 आणि डीसीएचसीमध्ये 46 बेडचा समावेश आहे.

तसेच जिल्हा प्रशासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 100 ऑक्सीजन बेड व 10 व्हेंटीलेटर, स्त्री रुग्णालय यवतमाळ येथे 100 बेड, उमरखेड ग्रामीण रुग्णालयात 30 ऑक्सीजन बेडची व्यवस्था, वणी ग्रामीण रुग्णालयात 50 ऑक्सीजन बेडचे डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर कार्यान्वित करण्याचे नियोजन केले आहे.

 

 

आयसीयु बेड

ऑक्सीजन बेड

नॉर्मल बेड

एकूण

उपयोगात

शिल्लक

एकूण

उपयोगात

शिल्लक

एकूण

उपयोगात

शिल्लक

1 जीएमसी

80

80

0

410

410

0

87

87

0

4 डीसीएचसी

-

-

-

97

70

27

143

97

46

33 सीसीसी

-

-

-

-

-

-

2573

1341

1232

24 खाजगी

206

192

14

454

343

111

145

79

66

००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी