ब्रेक दि चेन अंतर्गत 15 मे पर्यंत निर्बंध कायम

 


       यवतमाळ, दि. 30 : ब्रेक दि चेन अंतर्गत जिल्ह्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. तसेच सदर कालावधीत राज्यात कलम 144 (संचारबंदी) लागू करण्यात आली आहे. मुख्य सचिव यांच्या आदेशान्वये 1 मे च्या सकाळी 7 वाजेपासून ते 15 मे 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत ब्रेक दि चेन अंतर्गत घालून देण्यात आलेले निर्बंध कायम करण्यात आले आहेत.

त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 यातील मार्गदर्शक सूचनेनुसार यवतमाळ जिल्ह्याकरीता 15 मे 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत ब्रेक दि चेन अंतर्गत घालून देण्यात आलेले निर्बंध कायम केले आहे. तसेच सदर कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयाचे 14 एप्रिल, 20 एप्रिल व 22 एप्रिल 2021 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना दिनांक 15 मे 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहतील.

            सदर आदेश यवतमाळ शहर व जिल्ह्याकरीता शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील. जे वरील आदेशांचे उल्लंघन करतील त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व‍ नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी