जिल्ह्यात 1161 नव्याने पॉझेटिव्ह, 1057 कोरोनामुक्त

 


Ø इतर जिल्ह्यातील दोन मृत्युसह एकूण 34 मृत्यू

       यवतमाळ, दि. 30 : गत 24 तासात जिल्ह्यात 1161 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून 1057 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 34 मृत्यु झाले. यातील 18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, सात मृत्यु डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये तर नऊ मृत्यु खाजगी रुग्णालयात झाले.

जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण 6545 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1161 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5384 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6901 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2539 तर गृह विलगीकरणात 4362 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 53011 झाली आहे. 24 तासात 1057 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 44833 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1277 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.67 असून मृत्युदर 2.41 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 90 वर्षीय पुरुष व 50, 61 वर्षीय महिला, तालुक्यातील 40, 43, 80 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला, राळेगाव तालुक्यातील 17, 65 वर्षीय पुरुष, वणी येथील 69 वर्षीय पुरुष व 55 वर्षीय महिला, तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष, उमरखेड तालुक्यातील  80 वर्षीय महिला, दारव्हा येथील 57 वर्षीय पुरुष, आर्णि तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील 77 वर्षीय पुरुष, नेर तालुक्यातील 50 वर्षीय पुरुष आणि वाशिम येथील 52 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 71, 77, 65 वर्षीय पुरुष व 60, 87 वर्षीय महिला, पांढरकवडा येथील 52 वर्षीय पुरुष व 56 वर्षीय महिला, दारव्हा येथील 85 वर्षीय पुरुष, वणी येथील 51 वर्षीय पुरुष आहे. तर डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये मृत झालेल्यांमध्ये पांढरकवडा येथील 55 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला, झरी येथील 40 वर्षीय पुरुष, वणी येथील 45, 60, 63 वर्षीय पुरुष आणि हिंगणघाट येथील 59 वर्षीय पुरुष आहे.

            शुक्रवारी पॉझेटिव्ह आलेल्या 1161 जणांमध्ये 703 पुरुष आणि 458 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 330 पॉझेटिव्ह रुग्ण, वणी 112, पांढरकवडा 97, घाटंजी 190, दारव्हा 41, उमरखेड 77, आर्णि 27, दिग्रस 63, पुसद 83, नेर 26, महागाव 19, मारेगाव 33, झरीजामणी 5, बाभुळगाव  3, राळेगाव 3, कळंब 45 आणि इतर शहरातील 7 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 418495 नमुने पाठविले असून यापैकी 411313 प्राप्त तर 7182 अप्राप्त आहेत. तसेच 358302 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

०००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी