केंद्रीय पथकाची आर्णी, दिग्रस, पुसद कोविड सेंटरला भेट

 



यवतमाळ, दि. 10 : वाढत्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात दाखल झालेल्या केंद्रीय पथकाने आज तिसऱ्या दिवशी  आर्णी तालुक्यातील भंडारी , दिग्रस तालुक्यातील इसापूर  व पुसद शहरातील कोविड केअर सेंटरला भेटी दिल्या.

राष्ट्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेचे प्राध्यापक डॉ. जयंत दास आणि राम मनोहर लोहिया हॉस्पीटलचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. देवांग भारती या केंद्रीय पथकाच्या सदस्यांनी  आर्णी, दिग्रस, पुसद  तालुक्याला भेटी देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली.  या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिबंधित क्षेत्राला केंद्रीय पथकाने भेट देऊन पाहणी केली. कोविड केअर सेंटरमध्ये किती जण भरती आहे, त्यांना काय दिले जाते व काय काय सुविधा आहेत, याबाबत त्यांनी पाहणी केली. तसेच कॉटॅक्ट ट्रेसिंग, टेस्टिंग , लसीकरण याबाबत विचारणासुध्दा केली.

00000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती