Posts

Showing posts from August, 2020

जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु

  Ø 112 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर यवतमाळ, दि. 31 : जिल्ह्यात गत 24 तासात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 112 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. मृत झालेल्यांमध्ये आर्णि शहरातील 65 वर्षीय महिला आणि पांढरकवडा शहरातील 85 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 112 जणांमध्ये 70 पुरुष व 42 महिला आहेत. यात दिग्रस शहरातील सात पुरुष व एक महिला, आर्णी शहरातील दोन पुरूष, आर्णी तालुक्यातील तीन पुरूष व दोन महिला, दारव्हा शहरातील चार पुरूष व दोन महिला, दारव्हा तालुक्यातील 13 पुरूष व सहा महिला, यवतमाळ शहरातील सात पुरुष व चार महिला, यवतमाळ तालुक्यातील एक पुरूष, नेर शहरातील चार पुरुष व एक महिला, नेर तालुक्यातील चार पुरूष व तीन महिला, कळंब तालुक्यातील एक महिला, महागाव तालुक्यातील एक पुरूष, पुसद शहरातील 15 पुरूष व सात महिला, पांढरकवडा शहरातील तीन पुरूष व एक महिला, वणी शहरातील सहा पुरूष व 14 महिलांचा समावेश आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 790 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये 227 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 3399 झाल

जिल्ह्यातील प्रकल्प साठा व पूर परिस्थितीचा आरडीसींनी घेतला आढावा

  यवतमाळ, दि. 31 : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या सुचनेवरून निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांनी जिल्ह्यातील प्रकल्पात उपलब्ध असलेला पाणीसाठा आणि पूर परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या बैठकीला जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता श्री. मुंढे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून यांच्यासह कार्यकारी अभियंता व उपअभियंता उपस्थित होते. यावेळी बोलतांना निवासी उपजिल्हाधिकारी व-हाडे म्हणाले, ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात पूर परिस्थिती नसली तरी जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरली आहे. यापूढे येणा-या पावसाचे पाणी धरणातून सोडावे लागेल. अशा परिस्थतीत महसूल, जलसंपदा, पोलिस, विद्युत कंपनी आदी विभागांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. धरणातील पाणीपातळीचा स्तर कायम ठेवण्यासाठी यापूढे पाण्याचा विसर्ग होणार आहे. त्यामुळे फिल्डवरील यंत्रणेने अलर्ट राहावे. लोकांना वेळेत सुचना द्याव्या, असे निर्देश त्यांनी दिले. यवतमाळ जिल्ह्यात 1 जून ते 30 ऑगस्ट या कालावधीत 623 मि.मी. पाऊस

जिल्ह्यातील 236 जणांची कोरोनावर मात

  Ø 121 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर ; तिघांचा मृत्यु यवतमाळ, दि. 30 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड व विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 236  जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तसेच 24 तासात जिल्ह्यात तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 121 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 70 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष आणि यवतमाळ तालुक्यातील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 121 जणांमध्ये 78 पुरुष व 43 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 25 पुरुष व 22 महिला, महागाव शहरातील एक पुरुष व एक महिला, झरी तालुक्यातील एक पुरुष, दिग्रस शहरातील आठ पुरुष व दोन महिला, उमरखेड शहरातील सहा पुरुष व एक महिला, नेर शहरातील दोन पुरुष व तीन महिला, नेर तालुक्यातील एक पुरुष, वणी शहरातील 17 पुरुष व तीन महिला, कळंब शहरात 10 पुरुष व आठ महिला, बाभुळगावमध्ये दोन पुरुष व एक महिला, घाटंजी तालुक्यात एक पुरुष व एक महिला, पुसद शहरात दोन पुरुष व पुसद तालुक्यात एक पुरुष, पांढरकवडा शहरात एक महिला, दारव्हा श

कर्जमाफी मिळालेल्या शेतक-यांना तातडीने पीक कर्जवाटप करा - जिल्हाधिकारी एम.डी.सिंह

Image
                                Ø पालकमंत्र्यांच्या सुचनेवरून बँकर्सची बैठक यवतमाळ, दि. 30 : राज्य शासनाने शेतक-यांना दिलासा देण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील पात्र शेतक-यांना मिळत आहे. मात्र कर्जमाफी मिळालेल्या शेतक-यांना खरीप पीककर्ज देण्यासाठी बँका दिरंगाई करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी अतिशय गांभिर्याने घेतली असून प्रशासनाला त्यांनी सुचना केल्या आहेत. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतक-यांना बँकांनी तातडीने कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात बँकर्सच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी सविता चौधर, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक अरविंद देशपांडे आदी उपस्थित होते. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यात 1 लक्ष 8 हजार शेतकरी पात्र ठरले आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, यापैकी 78304 शेतक-यांना 579.38 कोटींच्या कर

जिल्ह्यात चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु

Ø 43 पॉझेटिव्ह रुग्णांची नव्याने भर यवतमाळ, दि. 29 : गत 24 तासात जिल्ह्यात चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याने आतापर्यंत मृत्युची एकूण संख्या 79 झाली आहे. तर जिल्ह्यात 43 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. तर आयसोलेशन वॉर्ड व विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या चार जणांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. मृत झालेल्यांमध्ये आर्णि तालुक्यातील 36 वर्षीय पुरुष, आर्णि शहरातील 55 वर्षीय पुरुष, महागाव तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष आणि पांढरकवडा शहरातील 63 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात गत 24 तासात नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 43 जणांमध्ये 27 पुरुष व 16 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 10 पुरुष व 13 महिला, दारव्हा तालुक्यातील एक पुरुष, आर्णि तालुक्यातील एक पुरुष, महागाव तालुक्यातील एक पुरुष, पुसद शहरातील चार पुरुष व दोन महिला, दिग्रस शहरातील नऊ पुरुष व एक महिला आणि पांढरकवडा शहरातील एक पुरुष पॉझेटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 713 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर 150 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 316

पोकरा योजनेंतर्गत शेतक-यांकडून अर्ज घेण्याला पुन्हा परवानगी - कृषीमंत्री दादाजी भुसे

Image
  Ø शेतक-यांपर्यंत पोहचून अर्ज घेण्याचे कृषी विभागाला निर्देश यवतमाळ, दि. 29 : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा) ही शेतक-यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडविणारी योजना आहे. शेतक-यांकडून पोकरा योजनेअंतर्गत नोव्हेंबर 2018 ते मे 2020 पर्यंत अर्ज घेणे सुरु होते. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मे महिन्यापासून शेतक-यांकडून अर्ज घेणे बंद करण्यात आले. मात्र यवतमाळ जिल्ह्यात पोकरा योजनेचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्यामुळे जिल्ह्यात आजपासूनच शेतक-यांकडून अर्ज घेण्याला पुन्हा परवानगी देण्यात येत आहे. कृषी विभागाने शेतक-यांपर्यंत पोहचून या योजनेचे अर्ज घ्यावे, असे स्पष्ट निर्देश कृषीमंत्री तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. नियोजन सभागृहात आयोजित कृषी विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री संजय राठोड, जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोकरा योजनेचे राज्य समन्वयक विजय कोळेकर, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते. नानाजी देशमुख कृषी संजीवन

जिल्ह्यात 229 जणांची कोरोनावर मात

  Ø 122 जण नव्याने पॉझेटिव्ह यवतमाळ, दि. 28 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या 229 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात 122 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 122 जणांमध्ये 80 पुरुष व 42 महिला आहेत. यवतमाळ शहरातील 27 पुरुष व 21 महिला, कळंब शहरातील एक पुरूष, महागाव शहरातील 10 पुरुष व एक महिला, पुसद शहरातील चार पुरुष, पांढरकवडा शहरातील सात पुरुष, आर्णी तालुक्यातील पाच पुरुष व तीन महिला, घाटंजी शहरातील एक पुरूष व एक महिला, बाभुळगाव तालुक्यातील चार पुरूष व एक महिला, दारव्हा तालुक्यातील दोन पुरुष व चार महिला, वणी तालुक्यातील 10 पुरुष व सहा महिला, दिग्रस तालुक्यातील आठ पुरुष व तीन महिला, नेर तालुक्यातील एक पुरुष व एक महिलेचा समावेश आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 723 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर 104 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 3121 झाली आहे. यापैकी 2219 जण

अपूर्ण कामांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची गंभीर दखल घ्या

Image
  Ø पालकमंत्र्यांचे सा.बा. विभागाला स्पष्ट निर्देश यवतमाळ, दि.28 : जिल्ह्यात रस्ते बांधकाम व नागरी सुविधांची अनेक कामे अर्धवट असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याची गंभीर दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.             जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात सा.बा.विभाग व जि.प.बांधकाम विभाग यांचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जि.प.चे मुख्य कार्यकारी अभियंता डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार प्रामुख्याने उपस्थित होते.             जिल्ह्यात आठ महामार्गांचे 1175 कोटींची कामे सुरू आहेत. मात्र काम करणाऱ्या कंपन्या वेळेच्या आत काम करत नाही. अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यामुळे राज्यमार्गावरील वाहतुकीस अळथळा निर्माण होत आहे. ही कामे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. कामचुकारपणा करणाऱ्या कंत्राटदार कंपनीवर दंड लावून

जिल्ह्यात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु

  Ø 80 जण नव्याने पॉझेटिव्ह ; 26 जणांना सुट्टी यवतमाळ, दि. 27 : जिल्ह्यात गत 24 तासात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याने आतापर्यंत मृत्युंची एकूण संख्या 75 झाली आहे. तर 80 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची जिल्ह्यात भर पडली आहे. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या 26 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 65 वर्षीय पुरुष, 71 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय पुरुष, 75 वर्षीय पुरुष आणि यवतमाळ तालुक्यातील 51 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 80 जणांमध्ये 52 पुरुष व 28 महिला आहेत. यवतमाळ शहरातील पाच पुरुष व सहा महिला, कळंब शहरातील एक महिला, कळंब तालुक्यातील एक पुरुष, महागाव शहरातील 15 पुरुष व आठ महिला, महागाव तालुक्यातील एक महिला, पुसद शहरातील 12 पुरुष व सात महिला, पांढरकवडा शहरातील चार पुरुष, आर्णी तालुक्यातील दोन पुरुष, घाटंजी शहरातील एक महिला, बाभुळगाव तालुक्यातील एक महिला, दारव्हा तालुक्यातील एक पुरुष, वणी तालुक्यातील न

आरोग्यासाठी ‘रानभाज्या’ अतिशय पौष्टिक – पालकमंत्री राठोड

Image
  Add caption Ø जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हास्तरीय महोत्सवाचे उद्घाटन यवतमाळ, दि. 27 : सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढला आहे. निरोगी राहण्यासाठी मनुष्याची धडपड सुरू आहे. त्यासाठी नियमित व्यायाम व सकस आहारावर जोर देण्यात येत आहे. सकस अन्नमध्ये विविध भाज्यांचा समावेश होतो. रानावनात नैसर्गिकरित्या उगविलेल्या भाज्या यासाठी उत्तम पर्याय असून या रानभाज्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे, असे प्रतिपादन वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कृषी विकास अधिकारी राजेंद्र धोंगडे आदी उपस्थित होते. राज्यातील वनांमध्ये रानभाज्यांचे चांगले वैभव आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, मानवी शरीरासाठी पौष्टिक असणा-या या भाज्यांचे महत्व व त्

किशोर तिवारी यांनी घेतला विविध विषयांचा आढावा

Image
  यवतमाळ, दि. 27 : वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा घेतला. यात प्रामुख्याने आरोग्य, कृषी, शिक्षण यांचा प्रामुख्याने समावेश होता. बैठकीला जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, उपजिल्हाधिकारी सविता चौधर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. बाबा येलके, डॉ. विजय डोंबळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते. यावेळी किशोर तिवारी म्हणाले, नागरिकांच्या मनातून कोरोनाची भीती कमी करण्यासाठी अधिका-यांनी जनजागृती करावी. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणतीही सुचना न देता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दौरा करावा. असुविधा दिसल्या तर संबंधितांवर कारवाई करावी. शेतमालावर बोंडअळीचे आगमन झाले आहे.   किटकनाशक फवारणीमुळे शेतकरी / शेतमजुर बाधित होऊ देऊ नका. विषबाधेचा एकही मृत्यु होता कामा नये. सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवर नागरिकांचा विश्वास वाढावा, या

जिल्ह्यातील 83 जणांची कोरोनावर मात

  Ø दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु Ø  90 पॉझेटिव्ह रुग्णांची नव्याने भर यवतमाळ, दि. 26 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या 83 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 90 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. मृत झालेल्या दोन जणांमध्ये दारव्हा शहरातील 86 वर्षीय पुरुष आणि महागाव तालुक्यातील 84 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात 24 तासात नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 90 जणांमध्ये 49 पुरुष आणि 41 महिला आहेत. यात पुसद शहरातील नऊ पुरुष व नऊ महिला, पुसद तालुक्यातील एक पुरुष, वणी शहरातील तीन पुरुष व एक महिला, वणी तालुक्यातील एक पुरुष, आर्णि शहरातील दोन पुरुष व एक महिला, दिग्रस शहरातील नऊ पुरुष व दहा महिला, दिग्रस तालुक्यातील दोन पुरुष, महागाव तालुक्यातील एक पुरुष, उमरखेड शहरातील चार पुरुष, यवतमाळ शहरातील 10 पुरुष व 12 महिला, बाभुळगाव तालुक्यातील एक पुरुष, दारव्हा तालुक्यातील दोन महिला, घाटंजी शहरातील दोन पुरुष व

जिल्ह्यात नव्याने 110 पॉझेटिव्ह ; दोघांचा मृत्यु

  Ø 31 जणांना सुट्टी यवतमाळ, दि. 25 : जिल्ह्यात गत 24 तासात 110 नवीन पॉझेटिव्ह रुग्ण्‍ा आढळले असून दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 31 जण ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. मृत झालेल्या दोन जणांमध्ये यवतमाळ शहरातील एक पुरुष व एक महिला आहे. 43 वर्षीय पुरुष हा 23 ऑगस्ट रोजी वैद्यकीय महाविद्यालयात भरती झाला होता. पाच दिवसांपासून त्याला ताप व सर्दी होती. आज दुपारी त्याचा मृत्यु झाला. तर यवतमाळ शहरातील 44 वर्षीय महिला 21 ऑगस्ट रोजी वैद्यकीय महाविद्यालयात भरती झाली होती. तिला आठ दिवसांपासून खोकला होता. तसेच तीन दिवसांपासून श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे 24 ऑगस्टच्या रात्री तिचा मृत्यु झाला. 24 तासात जिल्ह्यात नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 110 जणांमध्ये 69 पुरुष आणि 41 महिला आहेत. यात यात महागाव तालुक्यातील पाच पुरुष व चार महिला, दारव्हा शहरातील दोन पुरुष व एक महिला, यवतमाळ शहरातील 27 पुरुष व 12 महिला, वणी शहरातील चार पुरुष व दोन महिला, द

जिल्हाधिका-यांची महागाव येथील कोव्हीड केअर सेंटरला भेट व रुग्णांशी संवाद

Image
  Ø महागाव , उमरखेड व आर्णि तालुक्याचा आढावा यवतमाळ, दि. 25 : कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी महागाव येथील कोव्हीड केअर सेंटरला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. तसेच येथे भरती असलेल्या रुग्णांची आस्थेवाईपणे विचारपूस करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, यवतमाळचे उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, उमरखेडचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनीस, जिल्हा शल्य चिकत्सिक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण आदी उपस्थित होते. महागाव, आर्णि आणि उमरखेड येथील तालुकास्तरीय यंत्रणेला मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी म्हणाले, पुढील एक महिना अतिशय महत्वाचा असून कोरोना संसर्गाच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येक गावातील को-मॉरबीड (मधुमेह, रक्तदाब व इतर आजारांनी व्याधीग्रस्त असलेले) असलेल्या नागरिकांची ग्रामस्तरीय समितीमार्फत नियमित आरोग्य तपासणी करावी. तसेच प्रत्येक गावात सारी व आयएलआय सारखी लक्षणे असलेल्या नागरिकांची तपासणी करून याबाबत आरोग्य यंत्रणेला त्

यवतमाळ शहरात 27 ऑगस्ट रोजी 'रानभाजी महोत्सव'

  Ø पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन यवतमाळ, दि. 25 :   कृषीमंत्री यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात 27 ऑगस्ट रोजी   जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे ‘रानभाजी महोत्सव’ आयोजित करण्यात येत असून पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्धाटन होणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष कालिंदा पवार, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह तसेच जिल्ह्यातील मान्यवर खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधी हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अनन्यसाधारण महत्व आहे. सकस अन्नासाठी आपल्या आहारामध्ये विविध भाज्यांचा समावेश असणे अत्यंत महत्वाचे आहे. रानावनातील व शेतशिवारातील नैसर्गिकरित्या उगवलेल्या रानभाज्यामध्ये व फळभाज्यामध्ये औषधी गुणधर्म तसेच शरीराला आवश्यक असणारे पौष्टीक घटक असतात. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्या अतिशय उपयुक्त आहेत. याबाबत सर्व स्तरातील नागरिकांना माहिती होणे आवश्यक आहे. रानभाज्या नैसर्गिकरीत्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक किटकनाशक, बुरशीनाशक फवारणी करण्यात येत नाही. त्यामुळे त्या पुर्णपणे सेंद्रिय असतात. यवतमाळ जिल्हयात साधारणतः तरोट

दोन कोरोनाबाधित रुग्णांचामृत्यु ; 94 नव्याने पॉझेटिव्ह

  Ø 47 जणांना सुट्टी यवतमाळ, दि. 24 : जिल्ह्यात गत 24 तासात 94 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली असून दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 47 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 67 वर्षीय महिला आणि पुसद शहरातील 60 वर्षीय पुरुष आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 94 जणांमध्ये 60 पुरुष व 34 महिला आहेत. यात बाभुळगाव तालुक्यातील एक पुरूष, आर्णी शहरातील तीन पुरूष व एक महिला, यवतमाळ शहरातील 19 पुरूष व नऊ महिला, पुसद शहरातील 14 पुरूष व सात महिला, पांढरकवडा शहरातील दोन पुरूष, दारव्हा शहरातील एक पुरूष, वणी शहरातील चार पुरूष व 11 महिला, महागाव तालुक्यातील पाच पुरूष व एक महिला, उमरखेड शहरातील एक पुरूष, दिग्रस शहरातील 10 पुरूष व पाच महिलांचा समावेष आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 592 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये तर 196 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 2714 झाली आहे. यापैकी 1

पालकमंत्र्यांच्या हस्ते 12 कुटुंबांना धनादेश वितरीत

Image
  Ø राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजना यवतमाळ, दि. 24 : राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत नेर तालुक्यातील 12 कुटुंबाना प्रत्येकी 20 हजार रुपये याप्रमाणे एकूण 2 लक्ष 40 हजार रुपयांचे धनादेश पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. नेर येथील विश्रामगृहात पालकमंत्र्यांनी लाभार्थी कुटुंबाला धनादेश दिले. यावेळी जि.प.सदस्य भरत मसराम, न.प.उपाध्यक्ष पवन जयस्वाल, कृऊबास सभापती भाऊराव झगडे, उपभापती प्रवीण राठोड, मनोज नाले, तहसीलदार अमोल पोवार, गटविकास अधिकारी युवराज मेहेत्रे, नायब तहसीलदार संजय भोयर, रुपेश गुल्हाणे आदी उपस्थित होते. कुटूंबप्रमुखाचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटूंबाला सांत्वनपर मदत म्हणून राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत मदत दिल्या जाते. त्यानुसार 12 कुटुंबांना ही मदत देण्यात आली आहे. यावेळी पालकमंत्री राठोड यांनी नेर तालुक्यातील विविध गावातील नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण केले. तसेच सोयाबीनवर आलेल्या कीड व रोगामुळे खराब झालेल्या पिकाची तत्काळ पाहणी करून अहवाल द्यावा, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी य

जिल्ह्यात 97 जणांची कोरोनावर मात

  Ø 43 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर ; एकाचा मृत्यु यवतमाळ, दि. 23 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 97 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात गत 24 तासात 43 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला आहे. मृत झालेली व्यक्ती (पुरुष / वय 62) पुसद येथील असून ते 20 ऑगस्ट रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भरती झाले होते. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित मृतांचा आकडा एकूण 64 झाला आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 43 जणांमध्ये 22 पुरुष आणि 21 महिला आहेत. यात दारव्हा शहरातील दोन पुरुष, यवतमाळ शहराच्या विविध भागातील दोन पुरुष व पाच महिला, महागाव शहरातील सात पुरुष व चार महिला, महागाव तालुक्यातील एक पुरुष, नेर तालुक्यातील एक महिला, पुसद शहराच्या विविध भागातील चार पुरुष व दोन महिला, आर्णि शहराच्या विविध भागातील दोन पुरुष, वणी शहराच्या विविध भागातील एक पुरुष व दोन महिला, घाटंजी तालुक्यातील एक पुरुष, उमरखेड शहरातील एक पुरुष, पांढरकवडा शहरातील चार महिला,

‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ : 42 जणांना सुट्टी

  Ø 55 नव्याने पॉझेटिव्ह यवतमाळ, दि. 22 : वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 42 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 55 पॉझेटिव्ह रुग्णांची नव्याने भर पडली आहे. आज (दि. 22) नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 55 जणांमध्ये 34 पुरुष आणि 21 महिला आहेत. यात पांढरकवडा शहरातील दोन पुरुष, आर्णि शहरातील दोन पुरुष, वणी शहरातील एक महिला व वणी येथील दोन महिला व एक पुरुष, महागाव शहरातील तीन पुरुष, दिग्रस शहरातील तीन पुरुष व पाच महिला, दिग्रस शहरातील नागोबा मंदीर येथील एक पुरुष, पुसद शहरातील दोन महिला, पुसद शहरातील गायमुख नगर येथील दोन पुरुष, स्टेट बँक चौक येथील एक पुरुष व एक महिला, पुसद तालुक्यातील जाम बाजार येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील चार पुरुष व तीन महिला, यवतमाळ शहरातील पिंपळगाव येथील एक महिला, तलावफैल येथील एक पुरुष, सिव्हील लाईन पिस्ता शॉप येथील दोन पुरुष, अग्रवाल ले-आऊट येथील दोन महिला व एक पुरुष, वंजारी फैल येथील एक पुरुष, यवतमाळ येथील तीन पुरुष व एक महिला, नेर तालुक्यातील मोझर येथील दोन महि

‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ : 66 जणांना सुट्टी

  Ø एकाचा मृत्यु ; 40 नव्याने पॉझेटिव्ह यवतमाळ, दि. 21 : वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 66 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला असून 40 पॉझेटिव्ह रुग्णांची नव्याने भर पडली आहे. मृत झालेला व्यक्ती हा पुसद येथील आंबेडकर वॉर्डातील रहिवासी 60 वर्षीय पुरुष आहे. आज (दि. 21) नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 40 जणांमध्ये 24 पुरुष आणि 16 महिला आहेत. यवतमाळ शहरातील श्रीकृष्ण सोसायटी येथील तीन महिला, सेजल सोसायटी अंबिका नगर येथील तीन पुरुष व तीन महिला, आदर्श नगर येथील एक पुरुष व एक महिला आणि यवतमाळ शहरातील एक पुरुष, महागाव शहरातील एक पुरुष व दोन महिला, पांढरकवडा शहरातील दोन पुरुष, बाभुळगाव शहरातील दोन पुरुष, आर्णि शहरातील पोलिस स्टेशन जवळील एक पुरुष, आंबेडकर चौकातील तीन पुरुष, झरी शहरातील दोन पुरुष, वणी शहरातील वामन घाट येथील एक पुरुष, वणी शहरातील एक पुरुष व तीन महिला, उमरखेड शहरातील एक पुरुष, दिग्रस शहरातील एक पुरुष, दारव्हा शहरातील चार पुरुष व तीन महिला

जिल्ह्यात 24 तासात 115 पॉझेटिव्ह रुग्णांची भर

  Ø 25 जणांना सुट्टी यवतमाळ, दि. 20 : जिल्ह्यात गत 24 तासात 115 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. तर आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 25 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आज (दि. 20) नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 115 जणांमध्ये 75 पुरुष आणि 40 महिला आहेत. यात दिग्रस शहरातील सात पुरूष व 10 महिला, नेर शहरातील एक पुरूष व एक महिला, पुसद शहरातील दोन पुरूष व दोन महिला, पुसद तालुक्यातील एक पुरूष, वणी शहरातील नऊ पुरूष व तीन महिला, वणी तालुक्यातील एक पुरूष, आर्णी शहरातील तीन पुरूष व चार महिला, आर्णी तालुक्यातील एक पुरूष, यवतमाळ शहरातील 15 पुरूष व आठ महिला, दारव्हा शहरातील 13 पुरूष व एक महिला, पांढरकवडा शहरातील तीन पुरूष व दोन महिला, बाभुळगाव शहरातील पाच पुरूष, बाभुळगाव तालुक्यातील एक पुरूष, महागाव शहरातील पाच पुरूष व पाच महिला, उमरखेड शहरातील सहा पुरूष एक महिला, घाटंजी शहरातील दोन महिला, राळेगाव तालुक्यातील एक महिला व किनवट शहरातील एक पुरूषाचा समावेश आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 681 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती तर 141 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. स

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

Image
  यवतमाळ, दि.20 : जिल्ह्यात काही तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याबाबत तसेच आगामी गणेशोत्सवाच्या संदर्भात करावयाच्या उपाययोजना या संदर्भात पालकमंत्री संजय राठोड यांनी यंत्रणेचा आढावा घेतला. नियोजन सभागृहात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, सहाय्यक जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, अपर पोलिस अधिक्षक नुरुल हसन, उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते.       यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात मृत्युचा आकडा रोजच वाढत आहे. तसेच यवतमाळ, पुसद, दिग्रस, उमरखेड, केळापूर या तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुकास्तरीय सर्व अधिका-यांनी गांभीर्याने कामे करावी. हा आकडा असाच वाढत राहिला तर तालुकास्तीय समितीत असलेल्या सदस्यांना जाब विचारण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत आपल्या तालुक्याचा कोरोनाबा