जिल्ह्यात 24 तासात 127 नवीनपॉझेटिव्ह रुग्णांची भर

 


Ø  तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु ; 33 जणांना सुट्टी

यवतमाळ, दि. 11 : जिल्ह्यात आज (दि. 11) नव्याने 127 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली असून तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला. तसेच आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड सेंटरमध्ये भरती असलेले 33 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील वडगाव येथील 50 वर्षीय पुरुष, उमरखेड शहरातील वॉर्ड क्रमांक 1 मधील 65 वर्षीय पुरुष आणि आर्णि शहरातील मोमीनपुरा येथील 40 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 127 जणांमध्ये 69 पुरुष व 58 महिला आहेत.

यात यवतमाळ शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील एक पुरूष व एक महिला, पिंपळगाव येथील एक महिला, मनिपाडा येथील एक पुरूष, साने गुरूजी नगर येथील एक महिला, पाटीपुरा येथील एक पुरूष, दलीत सोसायटी येथील एक पुरूष, यवतमाळ शहराच्या इतर भागातील सहा पुरूष व सात महिला,  वणी शहरातील चार पुरूष, उमरखेड ढाणकी येथील एक महिला, उमरखेड शहरातील सहा पुरूष व पाच महिला, पुसद तालुक्यातील इसापुर येथील दोन महिला, श्रीरामपुर येथील एक पुरूष, पुसद शहरातील सुभाष वार्ड येथील एक पुरूष व चार महिला, शिवाजी वार्ड येथील एक महिला, बालाजी पार्क येथील एक पुरूष व दोन महिला, पुसद शहराच्या इतर भागातील 12 पुरूष व 11 महिला, पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा येथील एक पुरूष, पांढरकवडा शहरातील 13 पुरूष व 12 महिला, नेर शहरातील खडकपुरा येथील एक पुरूष व शहराच्या इतर भागातील दोन पुरूष,  महागाव तालुक्यातील बेरदरी येथील नऊ पुरूष व पाच महिला, घाटंजी तालुक्यातील अकोला बाजार येथील एक पुरूष, दिग्रस शहरातील तीन पुरूष व एक महिला, दारव्हा शहरातील चार पुरूष व दोन महिला, राळेगाव येथील एका महिलेचा समावेश आहे. 

जिल्ह्यात मंगळवारी तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु आणि 'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' झालेल्या 33 जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 587 आहे. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 1886 झाली आहे. यापैकी 1250 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 49 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 142 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने मंगळवारी 60 नमुने पाठविले असून सुरवातीपासून आतापर्यंत 29011 नमुने पाठविले आहे. यापैकी 27741 प्राप्त तर 1270 अप्राप्त आहेत. तसेच 25855 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

०००००००

Comments

  1. सर सगळे परिसर जिथे जिथे Corona positive yet आहे तिथले पण नाव सांगावे.जेव्हा पर्यंत लोकांना कळेल नाही आपल्या area मधील कोणी positive आला लोक बिनधास्त मोकाट फिरून राहिले

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी